Latest Marathi News | भगर उठली जीवावर; खाल्ल्याने अनेकांना विषबाधा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

While examining the patients who were poisoned by Bhargri, Dr. Tushar Bhagwat at Andarsul

भगर उठली जीवावर; खाल्ल्याने अनेकांना विषबाधा

अंदरसूल (जि. नाशिक) : नवरात्रोत्सवाच्या उपवासादरम्यान खाल्लेल्या भगरीमुळे अंदरसूल परिसरातील सात गावांतील सुमारे चाळीसवर नागरिकांना विषबाधा झाल्याने अनेकांचे जीव धोक्यात आले आहेत. या सर्वांवर येथील दवाखान्यामध्ये उपचार करण्यात येत असून, सर्व दवाखाने फुल झाले आहेत. (food poisoning through Bhagar by eating at andarsul nashik Latest Marathi News)

हेही वाचा: कुटुंबीयांच्या पाठबळावर सुवर्णा चव्‍हाणके यांची Cancerवर मात

नवरात्रीच्या उपवासाला सुरवात झाली असून, अनेकांनी उपवासाचा पदार्थ म्हणून भगर शिजवून खाल्ल्याने उलट्या होऊ लागल्या. देवठाण, भुलेगाव, अंगुलगाव, रास्ते सुरेगाव, अंदरसूल, देवळाणे, पिंपळखुटे अशा अनेक गावांतील महिला-पुरुषांना भगर खाल्ल्यानंतर अंग थरथरू लागले असून, सलग उलट्या होऊ लागल्याने अनेकांनी अंदरसूल येथील खासगी रुग्णालयात धाव घेतली. ज्या लोकांना उपवास आहे अशा लोकांनी भगर खाणे टाळावे, असे आवाहन अंदरसूल येथील डॉ. बी. के. जाधव, डॉ. तुषार भागवत, डॉ. जैन आदींनी केली आहे.

हेही वाचा: महिलांनो दागिने सांभाळा; सोनसाखळी चोरट्यांकडून धोका