Nashik News : होळकर पुलावरील पादचारी मार्गाला भेगा

Holker Bridge
Holker Bridgeesakal

पंचवटी : होळकर पुलाच्या जुना दगडी पूल आणि त्याला समांतर बांधलेला काँक्रीटचा पूल, अशा या पुलावरून एकेरी वाहतुकीची व्यवस्था आहे. दोन्ही बाजूला पायी जाणाऱ्यांसाठी असलेल्या पुलाच्या मार्गावर ठिकठिकाणी भेगा पडल्या असल्याने हा भाग धोकादायक झाला आहे.

काही ठिकाणी पडलेल्या भेगा मोठ्या झालेल्या असल्याने त्यावरून जाणाऱ्यांना त्या ओलांडताना काळजी घ्यावी लागत आहे. होळकर पुलावरील दोन्ही बाजूच्या पायी जाणाऱ्या मार्गावर अशा भेगा पडलेल्या आहेत. (Footpath on Holkar Bridge damage Nashik News)

Holker Bridge
Nashik News : गंगापूर कॅनॉल मध्ये आढळला दुचाकी सह संशयास्पद मृतदेह

जुन्या पुलाच्या मार्गावर पडलेल्या भेगातून तर खाली गोदापात्र सहज दिसते. या पुलावरून शाळकरी मुले, महिला, वयोवृद्ध व्यक्ती अशा अनेकांची पायी ये- जा सुरू असते. त्यांच्या दृष्टीने या भेगा अडचणीच्या ठरत आहेत.

काही भेगा तर इतक्या मोठ्या आहेत. की त्यात जर लहान मुलांचे पाय पडले तर पाय अडकतील इतक्या मोठ्या झालेल्या आहेत. लोकवस्ती, व्यवसाय, मंदिरे आणि पर्यटन आदी या पुलाच्या दोन्ही बाजूला असल्याने येथून स्थानिक नागरिक विविध कामांसाठी ये- जा करीत असतात. व्यावसायिकांची दुकाने असल्याने त्यांच्याकडे येणारे ग्राहक याच पुलावरून येतात.

गुंतवणूक करताना ‘हम होंगे कामयाब, पूरा है विश्वास!’...पण कसे? घ्या जाणून

Holker Bridge
Nashik News | ज्ञानदीपमधील अत्याचार प्रकरणी आयोगाला स्वतंत्र अहवाल देणार : सेवानिवृत्त पोलिस महासंचालक प्रवीण दीक्षित

मंदिरात दर्शनासाठी व पर्यटनासाठी आलेल्या भाविकही याच पुलावरून येतात. त्यामुळे पुलावरून जशी वाहनांची वर्दळ सुरू असते, तशीच पायी ये- जा करणाऱ्यांचीही असते. अशा या पुलावर पडलेल्या भेगा अडचणीच्या ठरत असल्याने त्या बुजवून त्यावर डागडुजी करणे गरजेचे आहे. होळकर पुलावर रेलिंगच्या जाळ्या तुटल्या होत्या.

त्या जाळ्यावर तात्पुरत्या स्वरूपात तारा बांधण्यात आलेल्या होत्या. तरी त्या धोकादायक वाटत असल्याने त्याच्या तक्रारी वाढल्याने या रेलिंगच्या तुटलेल्या जाळ्यांच्या जागी लोखंडी पाइपच बसविण्यात आले. त्यामुळे जाळ्याचा धोका राहिला नाही. मात्र, पायी जाण्याच्या मार्गावर असलेल्या भेगा अजूनही बुजविण्यात आलेल्या आहे. त्याही त्वरित बुजवून ही समस्या सोडविण्यात यावी, अशी मागणी होत आहे.

Holker Bridge
Nashik News : मीनाताई ठाकरे उद्यानात स्वच्छता मोहीम; उद्यानातील खेळण्यांची लवकरच दुरुस्ती!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com