esakal | गोड-मधाळ सिताफळांची ग्राहकांना भुरळ; आदिवासींना मिळतोय रोजगार | Nashik
sakal

बोलून बातमी शोधा

custard-apple

गोड-मधाळ सिताफळांची ग्राहकांना भुरळ; आदिवासींना मिळतोय रोजगार

sakal_logo
By
गोविंद अहिरे


नरकोळ (जि. नाशिक) :
आरोग्यवर्धक फळ म्हणून परिचित असलेले सीताफळ बाजारात विक्रीसाठी दाखल झाले असून, दर आवाक्यात असल्याने ग्राहकाची संख्या वाढत आहे.

कमी खर्चात पुरेसे उत्पादन देणारे फळ म्हणून याकडे पाहिले जाते. सीताफळ हंगाम हा तीन टप्प्यांत असला तरी पावसाळ्यात विशेषतः सप्टेंबर ते नोव्हेंबर या कालावधीत येणाऱ्या सिताफळांना मागणी जास्त असते. डोंगर कपारीत असलेल्या दाट जंगलात हे फळ मोठ्या प्रमाणात येते. अलिकडे सीताफळ शेतात तयार होत असून, औषध फवारणीचा खर्च कमी येतो. आदिवासी बांधवांच्या उपजीविकेचे साधन सीताफळ बनले असून, शहरात क्रेट्‌समधून सीताफळ विक्रीसाठी येतात. बाजारात सध्या प्रतिकिलो तीस ते चाळीस रुपये असा दर आहे.

सिताफळाचे फायदे…

सीताफळ हे गुणांचा खजिना आहे. हे हृदयाचे आरोग्य सुधारण्यासाठी कार्य करते. सीताफळात पोटॅशिअम आणि मॅग्नेशियम आढळते. या फळात पोषक घटकांचा खजिना आहे. व्हिटॅमिन (सी) आणि ऑन्टी, ऑक्सिडंटस समृद्ध असल्याने अलर्जी आणि कर्करोगाच्या जोखमीपासूनदेखील सीताफळ संरक्षण करते. या फळात बी - वन, बी - टू जीवनसत्त्व भरपूर प्रमाणात आहेत. दृष्टीदोष दूर करण्यास मदत होते.

सीताफळ आरोग्यदायी व सर्वगुणसंपन्न असल्याने या फळाला मागणी जास्त आहे. या फळाचे सेवन करणे फायदेशीर आहे.
- महारु निकम, शिक्षक, भादवन (ता. कळवण)

हेही वाचा: PHOTO : धबधबे अन् हिरव्यागार वनश्रीने नटला चणकापूर धरण परिसर!

हेही वाचा: आधार कार्ड आता स्वतःलाच करता येईल अपडेट, ही आहे सोपी प्रोसेस

loading image
go to top