esakal | डाळींच्या स्वयंपूर्णतेसाठी ८२ कोटींच्या बियाण्याच्या मिनी किटचे मोफत वितरण
sakal

बोलून बातमी शोधा

pulse

डाळींच्या स्वयंपूर्णतेसाठी ८२ कोटींच्या बियाण्याच्या मिनी किटचे मोफत वितरण

sakal_logo
By
महेंद्र महाजन

नाशिक : डाळींच्या (Pulses) उत्पादनातील स्वयंपूर्णतेसाठी केंद्र सरकारने यंदाच्या खरीप हंगामासाठी धोरण निश्‍चित केले. त्यानुसार ८२ कोटी एक लाख रुपये किमतीच्या बियाण्यांच्या (Seeds) २० लाख २७ हजार ३१८ मिनी किटचे वितरण केले जाणार आहे. गेल्या वर्षीपेक्षा दहापट अधिक आहे. (for self-sufficiency of pulses Free distribution of seed mini kits worth 82 crore)

शेतकऱ्यांना बियाण्यांचे मोफत वाटप

केंद्रीय कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालयाने हे धोरण आखले आहे. विविध राज्य सरकारांशी चर्चा करून, देशातील प्रमुख डाळी जसे तूर, मूग आणि उडीदडाळींच्या लागवडीचे क्षेत्र व उत्पादकता दोन्ही वाढविण्यासाठी योजना तयार केली आहे. या धोरणांतर्गत उत्तम पीक देणाऱ्या जातींचे बियाणे, जी केंद्रीय बीज संस्थांकडे अथवा राज्यांच्या बियाणे केंद्रांमध्ये उपलब्ध असतील, अशा सर्व बियाण्यांचे मोफत वाटप शेतकऱ्यांना केले जाणार आहे. आंतरपीक अथवा मुख्य पीक म्हणून डाळींची लागवड करण्यासाठी प्रोत्साहन दिले जाणार आहे. संपूर्ण बियाण्यांचा खर्च केंद्र सरकार करणार आहे.

हेही वाचा: भारतात पब्जी-टू होणार लॉंच? भारतीय संस्कृतीवर असणार नवी रचना !

तूरडाळ, मूगडाळ, उडीदडाळीची आयात

देशातील ११ राज्यांत आणि १८७ जिल्ह्यांत तूर आंतरपीक लागवड केली जाईल. त्यात महाराष्ट्राचाही समावेश आहे. मूग आंतरपीक लागवड क्षेत्र नऊ राज्ये आणि ८५ जिल्ह्यांत असेल. त्यातही महाराष्ट्राचा समावेश आहे. उडदाची आंतरपीक लागवड, महाराष्ट्रासह सहा राज्ये आणि सहा जिल्ह्यांत केली जाईल. उडदाची मुख्य पीक म्हणून लागवड सहा राज्यांत केली जाईल. त्यासाठी पुरविल्या जाणाऱ्या मिनी किट्स म्हणजेच छोट्या पिशव्या केंद्रीय अथवा राज्यांच्या यंत्रणांद्वारे जिल्हास्तरावर पोचविल्या जातील. १५ जूनला निश्चित करण्यात आलेल्या धोरणानुसार त्याची अंमलबजावणी होईल. भारत आजही चार लाख टन तूरडाळ, ६० हजार टन मूगडाळ आणि तीन लाख टन उडीदडाळीची आयात करतो.

हेही वाचा: ही दोस्ती तुटायची नाय! कोरोनाबाधित मित्राला बरे करूनच आणले घरी..

मोफत देण्यात येणाऱ्या पिशव्या

० तुरीच्या १३ लाख ५१ हजार ७१० पिशव्या (आंतरपीक म्हणून उत्पादकता हेक्टरी १५ क्विंटल)

० मुगाच्या चार लाख ७३ हजार २९५ पिशव्या (आंतरपीक म्हणून उत्पादकता हेक्टरी १० क्विंटल)

० उडदाच्या ९३ हजार ८०५ पिशव्या (आंतरपीक म्हणून उत्पादकता हेक्टरी १० क्विंटल) आणि एक लाख आठ हजार ५०८ पिशव्या (मुख्य पीक म्हणून उत्पादकता हेक्टरी १० क्विंटल)

(आंतरपीक आणि मुख्यपीक म्हणून उडीद बियाणे खरीप हंगामात चार लाख पाच हजार हेक्टरसाठी उपयोगी येईल.)

for self-sufficiency of pulses Free distribution of seed mini kits worth 82 crore