अवैधरित्या वृक्षतोड करणाऱ्या ट्रकवर वनविभागाची धडक कारवाई; ३ संशयित रंगेहाथ पकडण्यात यश

forest dept action.jpg
forest dept action.jpg

सिडको (नाशिक) : वनविकास नाशिक विभागाच्या गस्ती पथकाला मिळालेल्या गुप्त  माहितीनुसार अवैधरित्या वाहतूक होणार असल्याचे कळताच गस्ती पथकातील वनपरिमंडल अधिकारी राहुल वाघ, दीपक बोरसे, वनरक्षक सुनील बोरसे व वाहनचालक पंकज पाटील यांनी सापळा रचून मुंबई-आग्रा महामार्गावर घोटी ते नाशिक पाठलाग करून नाशिकजवळ गरवारे पॉईंटवर पहाटे ४:३० वा. आयशर गाडी व ३ संशयित रंगेहाथ पकडण्यात आले.

गाडी व ३ संशयित रंगेहाथ पकडण्यात यश

मिळालेल्या गुप्त माहिती नुसार विभागीय व्यवस्थापक यु. सी.ढगे व  वनपरिक्षेत्र अधिकारी पी.एस.डमाळे यांच्या मार्गदर्शनाखाली नाशिक कार्यकेंद्रातील घोटी परिसरात लगत असलेल्या मालकी क्षेत्रातील वृक्षतोड करून अवैधरित्या वाहतुक करणाऱ्या टाटा कंपनीच्या आयशर मिनी ट्रक(MH15 AG4600) पकडण्यात यश आले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com