esakal | वनखाते, शेतकऱ्यांनी मिळून सोडवला मोरांच्या पाण्याचा प्रश्न
sakal

बोलून बातमी शोधा

water for animals

चांदवड तालुका हा तसा दुष्काळी तालुका, परंतु या तालुक्याच्या गणुर आणि वडनेर भैरव या गावांमध्ये हरीण त्याचबरोबर मोर यांसारख्या पशुपक्ष्यांसाठी ही दोन्ही गावे ओळखली जातात. या गावात या दोन्हींचाही आदिवास, यामुळे या गावांना पर्यटनासाठी वेगळी ओळख मिळत आहे.

वनखाते, शेतकऱ्यांनी मिळून सोडवला मोरांच्या पाण्याचा प्रश्न

sakal_logo
By
सुभाष पुरकर

वडनेर भैरव (जि. नाशिक) : वडनेर भैरव येथील मोरांचा अधिवास असलेल्या लोधाई माता टेकडी येथे मोरांसाठी कृत्रिम पाणवठ्यात परिसरातील शेतकऱ्यांच्या सहकार्याने पाणी टाकण्यात आले. यामुळे मोरांच्या अन्न पाण्याचा प्रश्न काही अंशी सोडवण्यास मदत झाली. (Forest Department, farmers together arranged water for the peacocks)

हरीण, मोर यांचा मनसोक्त अधिवास…

चांदवड तालुका हा तसा दुष्काळी तालुका, परंतु या तालुक्याच्या गणुर आणि वडनेर भैरव या गावांमध्ये हरीण त्याचबरोबर मोर यांसारख्या पशुपक्ष्यांसाठी ही दोन्ही गावे ओळखली जातात. या गावात या दोन्हींचाही आदिवास, यामुळे या गावांना पर्यटनासाठी वेगळी ओळख मिळत आहे. वडनेर भैरव हे गाव द्राक्ष व टोमॅटो या नगदी पिकासाठी महाराष्ट्रभर प्रसिद्ध असून, या गावाच्या उत्तरेला असलेल्या लोधाईमाता या टेकडीवर काशी विश्वेश्वर गोरक्षनाथ मंदिर आणि अनेक परिवारांचे श्रध्दास्थान असलेली लोधाई माता यांची मंदिरे आहेत. या मंदिराच्या परिसरात मोर या राष्ट्रीय पक्ष्याचा शेकडोच्या संख्येने अधिवास आहे. यामुळे या भागाला कोरोनाच्या काळात केवळ पाच ते सहा हजार पर्यटकांनी परिवारासह भेट दिली.या भागाबरोबरच उखळी खंडाळ वाडी या भागात हरणांचे कळप बागडताना दिसतात. या सर्व मोरांना येथील शेतकऱ्यांकडून कुठल्याही प्रकारची भीती नसल्याने द्राक्ष बागांमध्ये सुद्धा मोरांचे थवे मनसोक्त फिरताना दिसतात.

ब्लोरच्या माध्यमातू्न तळ्यामध्ये पाणी…

सध्या उन्हाळ्याचे दिवस शेवटच्या टप्प्यात असल्याने अनेक मोर व हरीण हे पाण्याच्या शोधासाठी शेती परिसरात येताहेत हे शेतकऱ्यांना जाणवत होते. ही बाब नाशिक वन विभाग अधिकारी सुरज नेवसे यांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी या पशुपक्ष्यांसाठी कृत्रिम पाण्याचे तळे म्हणजेच पाणवठा सुरू करण्याचा निर्णय घेतला. त्यांच्या आदेशान्वये चांदवड वन विभाग अधिकारी पवार वडनेर भैरव वनपरिक्षेत्राधिकारी नानासाहेब चौधरी यांनी आपल्या सर्व सहकाऱ्यांच्या मदतीने उखळी आणि लढाई माता येथे कृत्रिम पाणवठे बनविले. लोधाई माता हे टेकडीवरती असल्याकारणाने येथे पाणी नेताना खूप अडचणी येत होत्या. टॅंकर टेकडीवर जात नव्हता म्हणून वनखात्याने व संयुक्त वन समितीने सलादे बाबा कला मंडळाचे अध्यक्ष मनोहर नाना पाटोळे या प्रगतिशील शेतकरी यांना द्राक्ष बागेसाठी फवारणी करणाऱ्या ब्लोरच्या माध्यमातू्न या तळ्यामध्ये पाणी टाकण्याची विनंती केली. त्यांचे चिरंजीव अवि मनोहर पाटोळे यांनी ट्रॅक्टरच्या व ब्लोअरच्या सहाय्याने मोरांसाठी पाणी उपलब्ध करून ते टाकण्याची व्यवस्था केली. त्यामुळे मोरया राष्ट्रीय पक्षाचे केवळ पाण्यासाठी द्राक्ष शेतीकडे व मानवी वस्तीकडे येण्याचे प्रमाण नक्कीच कमी होणार आहे.

हेही वाचा: शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था ‘मॉडेल आयटीआय’

मोरांना परिसराचे वैभव बनविणार

वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली मोरांसाठी कृत्रिम पाणवठा आम्ही सर्व सहकारी यांनी बनविल्याने मोरांच्या पाण्याची सोय या माध्यमातून होईल. टेकडीवर पाणी आणताना अडचणी येत होत्या म्हणून मनोहर नाना पाटोळे यांना विनंती केल्यानंतर त्यांनी केलेले सहकार्य हे इतर शेतकऱ्यांना प्रेरणा देणारे आहे.

- नानासाहेब चौधरी, वडनेर भैरव वन परिक्षेत्र अधिकारी

गावचे श्रद्धास्थान असलेल्या लोढाईमाता परिसरातील मोरांसाठी वन खात्याने राबवलेला उपक्रम अत्यंत स्तुत्य आहे. कृत्रिम पाणवठ्यासाठी माझ्यासह अनेक शेतकरी स्वखर्चाने त्यात पाणी भरण्यासाठी पुढे येऊ. राष्ट्रीय पक्षी मोर हे आमच्या परिसराचे वैभव बनवण्यासाठी आम्ही सर्वजण प्रयत्न करू.

- अविनाश पाटोळे, प्रगतिशील शेतकरी

हेही वाचा: नांदूरमध्यमेश्वर पक्षी अभयारण्य पर्यटकांसाठी खुले

वडनेर भैरव संयुक्त वन समितीच्यावतीने अध्यक्ष रामकृष्ण पवार उपाध्यक्ष दत्तात्रेय निखाडे कोषाध्यक्ष दत्त शिंदे यांच्यासह अनेकांनी वन खात्याचे व मनोहर नाना पाटोळे यांचे अभिनंदन करून आभार मानले. नाशिक जिल्हा वन खाते अधिकारी नेवसे, तालुका वन अधिकारी पवार यांच्या मार्गदर्शनाखाली निसर्ग पर्यटनसाठी प्रयत्न करणार असल्याचे संयुक्त वन समितीचे मार्गदर्शक सुरेश माधव सलादे यांनी सांगितले. लवकरच ग्रामस्थ आणि अधिकारी यांची पुढील नियोजनासाठी संयुक्त बैठक लावण्यात येईल व सर्वांच्या सहकार्याने या निसर्ग पर्यटन केंद्राचा विकास आराखडा तयार करण्यात येईल, अशी माहिती सुरेश सलादे यांनी दिली.

(Forest Department, farmers together arranged water for the peacocks)