esakal | पक्षीप्रेमींना पुन्हा पक्षीनिरीक्षणाची संधी! नांदूरमध्यमेश्वर अभयारण्य पर्यटकांसाठी खुले
sakal

बोलून बातमी शोधा

nandurmadhyameshwar sanctury

नांदूरमध्यमेश्वर पक्षी अभयारण्य पर्यटकांसाठी खुले

sakal_logo
By
माणिक देसाई

निफाड (जि.नाशिक) : कोरोनाचा प्रादुर्भाव (corona virus) कमी झाल्याने शासनाने नांदूर मध्यमेश्वर पक्षी अभयारण्यासह (nandurmadhyameshwar sanctury) राज्यभरातील आणखी चार अभयारण्य पर्यटकांसाठी खुली केली आहेत. त्यामुळे हिरवी बंद असलेले हे अभयारण्य पर्यटकांनी गजबजून जाणार आहे. पक्षीप्रेमींना पुन्हा पक्षीनिरीक्षणाची संधी उपलब्ध होणार आहे. (Nandurmadhyameshwar-Bird-Sanctuary-open-for-tourists-nashik-marathi-news)

धरण परिसरात पक्षांचा किलबिलाट; पुन्हा पक्षीनिरीक्षणाची संधी

महाराष्ट्राचे भरतपूर म्हणून ओळख असलेल्या नांदूर मध्यमेश्वर पक्षी अभयारण्य देश-परदेशातून मोठ्या प्रमाणात पक्ष्यांचे आगमन होते. येथे पर्यटकांसाठी असलेल्या विविध सुविधा वन्यजीव विभागाने उपलब्ध करून दिल्या आहेत. सध्या पावसाळी वातावरण असल्याने स्थानिक पक्ष्यांचा किलबिलाट ऐकू येत आहे. कोरोनाचा वाढता संसर्ग लक्षात घेतात शासनाने १४ एप्रिलला अभयारण्य पर्यटकांसाठी बंद केले होते. शासनाच्या सूचनांचे पालन करून नांदूर मध्यमेश्वर अभयारण्य पर्यटकांसाठी खुले करण्यात आले आहे. या अभयारण्यासह नगर जिल्ह्यातील कळसुबाई, हरिश्चंद्रगड अभयारण्य, धुळे जिल्ह्यातील अनेर डॅम, जळगाव जिल्ह्यातील यावल अभयारण्यदेखील पर्यटकांसाठी खुले करण्यात आले आहे. नांदूर मध्यमेश्वर परिसरात पर्यटकांची संख्या वाढणार आहे. दोन महिन्यांपासून अभयारण्य बंद असल्याने येथे असलेल्या गाईडना रोजगाराच्या संधी बंद झाल्या होत्या. पुन्हा एकदा अभयारण्य सुरू झाल्याने त्यांच्यात समाधानाचे वातावरण आहे. पर्यटकांमुळे गोदाकाठ परिसरातील व्यावसायिकांना त्याचा लाभ होणार आहे.

कोणत्या पक्ष्यांचा अधिवास?

सद्यस्थितीत नांदूर मध्यमेश्वर परिसरात हजार पक्ष्यांचा अधिवास दिसून येत आहे. यामध्ये ससाणा, कमल पक्षी, नदी, सुरय, हळदी कुंकू, वारकरी, जांभळी पाणकोंबडी, पाणकावळा, बगळा, खंड्या, राघू आदी पक्ष्यांचा समावेश आहे.

हेही वाचा: नाशिकमध्ये आता दुसरा 'मॅग्नाइट मॅन'!बघण्यासाठी गर्दी

हेही वाचा: लासलगाव बाजार समितीत ऐतिहासिक पंरपरा मोडित