leopard
नाशिकमध्ये लहान मुलांचा बळी घेणाऱ्या चार बिबट्यांना कायमचं कैदेत ठेवण्याचा निर्णय वनविभागाने घेतला आहे. वडनेर दुमाला इथं हल्ला करणारे दोन बिबटे आणि सिन्नर वनपरिक्षेत्रातील दोन बिबटे अशा चार बिबट्यांना वनविभागानं जेरबंद केलंय. त्यांना आयुष्यभरासाठी कैदेत ठेवण्याचा निर्णय घेण्यात आलाय. या चार बिबट्यांशिवाय इतर १० पेक्षा जास्त बिबट्यांनाही वनविभागानं जेरबंद केलं होतं. त्यांना पुन्हा नैसर्गिक अधिवासात सोडण्यात आलंय. तर चार बिबटे मोहदरी वनोद्यानातील पिंजऱ्यात जेरबंद आहेत.