Nashik : अखेर 'तो' बिबट्या जेरबंद करण्यात वन विभागाला यश

leopard caught
leopard caughtesakal

सिन्नर (जि. नाशिक) : सिन्नर तालुक्यातील पूर्व भागात मेंढी वडांगळी सोमठाणे आदी भागात बिबट्याच्या दहशतीखाली अनेक नागरिक वावरत होते सकाळी किंवा रात्री सुद्धा बाहेर निघण्यासाठी नागरिक धजावत नसल्याने बिबट्यांचा बंदोबस्त करण्यासाठी नागरिकांकडून मागणी होत होती.

अशातच मेंढी शिवारात एका बिबट्याने दुचाकी वर हल्ला केल्याने शेतकरी जखमी झालेले होते त्या बिबट्याला अखेर जेरबंद करण्यात वन विभागाला गुरुवारी यश आले आहे. यामुळे स्थानिक नागरिकांना दिलासा मिळाला असला तरी दहशत मात्र कायम आहे. (forest department succeeded in imprisoning leopard at sinnar nashik Latest Marathi News)

leopard caught
अंनत चतुर्दशीला पोलिस आले विघ्नहर्ता बनून; वाचविले महिला व मुलाचे प्राण

गेल्या काही दिवसांपासून एक बिबट्या व त्याचे बछडे स्थानिक शेतकऱ्यांच्या निदर्शनास येत होते. दरम्यान मेंढी- वडांगळी रोडवरील सुधाकर कुंडलिक गिते यांच्या घरामागे वनविभागाने पिंजरा लावला होता.

या पिंजऱ्यात एका बिबट्याला दि.८ रोजी मध्यरात्री वनविभागाला यश आले असून अजुनही बिबट्यांच्या बछड्यांचा मुक्त संचार असल्याचे शेतकऱ्यांकडून बोलले जात आहे. या परिसरात पुन्हा वन विभागाने पिंजरा लावावा अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.

leopard caught
गटारी गोदावरीत सोडल्या तर चालेल पण लोकांनी मूर्ती नाही टाकायच्या?

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com