Nashik News : सैनिकीपूर्व प्रशिक्षणासाठी मुलींची आघाडी! काठिण्य पातळीमुळे परीक्षार्थींना फुटला घाम

Exam
Examesakal

नाशिक : शासकीय सैनिकी सेवापूर्व प्रशिक्षण संस्‍थेत प्रवेशासाठी रविवारी (ता. ९) नाशिकमध्ये चार केंद्रावर लेखी परीक्षा झाली. या परीक्षेला मुलांसोबत या वर्षी प्रथमच मुलीदेखील सामोरे गेल्‍या.

विशेष म्‍हणजे प्रथमच परीक्षा देत असतानाही नाशिकमध्ये मुलांपेक्षा प्रविष्ट झालेल्‍या मुलींची संख्या अधिक राहिली. नाशिकमधून ७६६ मुली, तर ६८९ मुले या परीक्षेला सामोरे गेले. काठिण्य पातळीमुळे मात्र परीक्षार्थींना घाम फुटला. (four centers exam in Nashik for admission to Government Military Pre Service Training Institute news)

Exam
Success Story : आदिवासी गावातील नीलेश बनला वनपरिक्षेत्र अधिकारी; MPSCतून भरारी!

‘एनडीए’च्‍या प्रवेश परीक्षेची तयारी करून घेताना कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षण देण्यासाठी राज्‍य शासनाच्‍या माध्यमातून ‘एसपीआय’ ही संस्‍था चालविली जात आहे. छत्रपती संभाजीनगर येथे मुलांना प्रशिक्षण सुविधा असून, यंदापासून प्रथमच नाशिकमध्ये मुलींसाठी प्रशिक्षण सुविधा उपलब्‍ध होणार आहे.

आजच्या लेखी परीक्षेवेळी शेवटच्‍या मिनिटापर्यंत विद्यार्थी प्रश्‍न सोडविण्यात दंग होते. मुलांसाठी साठ, तर मुलींसाठी तीस जागांवर या परीक्षेच्‍या माध्यमातून प्रवेश दिले जाणार आहेत. मुलांना छत्रपती संभाजीनगरला, तर मुलींना नाशिक येथील संस्‍थेत प्रशिक्षण दिले जाणार आहे.

यामध्ये ‘एनडीए’ प्रवेश परीक्षेची तयारी करून घेण्यासह अकरावी, बारावी अशा विज्ञान शाखेतील कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षणाचा समावेश असणार आहे. "पहिल्‍यांदाच सामोरे जाताना मुलींची संख्या अधिक असणे हे आशादायी चित्र आहे. यापुढील कालावधीत ही संख्या आणखी वाढेल, अशी आशा आहे. योग्‍य प्रकारे तयारीने सामोरे गेलेल्‍या विद्यार्थ्यांना आजची परीक्षा सोपी गेली आहे." - हर्षल आहेरराव, मार्गदर्शक

हेही वाचा : सामान्यांचा पैसा सुरक्षित ठेवण्यासाठीच Virtual Currency करकक्षेत

Exam
Nashik Unseasonal Rain : इगतपुरीच्या पूर्व भागात गारपिटीचे पुन्हा थैमान; शेतकरी उध्वस्त..

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com