Nashik Unseasonal Rain : इगतपुरीच्या पूर्व भागात गारपिटीचे पुन्हा थैमान; शेतकरी उध्वस्त..

Nashik Unseasonal Rain Hundreds of hectares of land were affected
Nashik Unseasonal Rain Hundreds of hectares of land were affectedesakal

Nashik Unseasonal Rain : इगतपुरी तालुक्याच्या पूर्व भागात संध्याकाळी सात वाजता जोरदार वादळी वारा अन मेघगर्जनेसह तब्बल तासभर झालेल्या गारपीटीने शेकडो हेक्टर क्षेत्र बाधित झाले आहे. (Nashik Unseasonal Rain Hundreds of hectares of land were affected by hailstorm igatpuri nashik news)

रब्बी हंगामातील गहू, हरभरा, कांदा तसेच टोमॅटो, वांगी, काकडी, भेंडी, मका आदींसह बागायती पिकांचे प्रचंड नुकसान झाले आहे. शेतात काढणी करुन पोळ लावून ठेवलेला हरभरा, काढणीसाठी आलेला गहू, कांदा पीक गारपिटीने अक्षरशः झोडपून काढल्याने शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. आधीच आर्थिक संकटात असलेल्या शेतकऱ्यांना पंधरा दिवसांत दुसऱ्यांदा गारपीटीचा तडाखा बसल्याने शेतकरी पुर्णतः उध्वस्त झाला आहे.

काल सकाळ पासूनच ढगाळ वातावरणामुळे प्रचंड उकाडा जाणवत होता. संध्याकाळी सात वाजेदरम्यान आकाशात विजांचा कडकडाट अन वादळी वाऱ्यासह गारांच्या मुसळधार पावसाला सुरुवात झाली.

तासभर झालेल्या मुसळधारेने इगतपुरी तालुक्याच्या पूर्व भागातील शेणीत, साकुर, नांदगाव बु, पिंपळगाव घाडगा, पिंपळगाव डुकरा, कवडदरा, धामणी, धामणगाव, बेलगाव तऱ्हाळे, वंजारवाडी आदी गावातील परिसर अक्षरशः झोडपून काढला आहे.

हेही वाचा : सामान्यांचा पैसा सुरक्षित ठेवण्यासाठीच Virtual Currency करकक्षेत

Nashik Unseasonal Rain Hundreds of hectares of land were affected
Unseasonal Rain : बागलाण, मालेगावला अवकाळीचा तडाखा; बळीराजा हवालदिल!
अवकाळी पावसामुळे पिकांचे प्रचंड नुकसान झाले
अवकाळी पावसामुळे पिकांचे प्रचंड नुकसान झाले esakal

सायंकाळच्या सुमारास आलेल्या अवकाळी पावसामुळे गोवऱ्या तसेच जनावरांचा वाळलेला चारा झाकण्यासाठी शेतकऱ्यांची चांगलीच तारांबळ उडाली होती. मात्र काढणीसाठी आलेल्या गहू, हरभरा, कांदा व इतर बागायती पिकांसह चाऱ्याचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.

गारपिटीने झाडांना पाने देखील शिल्लक राहिली नाहीत!

साकुरसह परिसरात गत पंधरवड्यातील दुसऱ्यांदा गारपिटीने अक्षरशः झोडपून काढले आहे. यात प्रामुख्याने टोमॅटो, वांगी, काकडी, भेंडी, कांदा आदी बागायती पिकांचे प्रचंड नुकसान झाले आहे.

शेतात अर्ध्या फुटांवर गारांचा खच साचला होता. तासभर झालेल्या गारांच्या माऱ्यामुळे झाडाला फुले, फळ सोडा तर अक्षरशः पाने सुद्धा शिल्लक राहिली नाहीत. पुर्णतः पिकच नष्ट झाल्याने शेतकरी हतबल झाला आहे. त्यामुळे शासनाने तात्काळ नुकसान ग्रस्त भागाची पाहणी करावी व तात्काळ पंचनामे करुन नुकसानभरपाई द्यावी अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.

Nashik Unseasonal Rain Hundreds of hectares of land were affected
Unseasonal Rain : नाशिक जिल्ह्यात गारांसह अवकाळी पाऊस बरसला, शेतकऱ्यांच्या हाताशी आलेला घास हिरावला

"आधीच कर्जबाजारी असलेल्या शेतकऱ्याने मोठ्या प्रमाणात खर्च करुन जीवापाड जपलेली पिके गारपिटीमुळे पुर्णतः नष्ट झाली आहेत. टोमॅटो, वांगी, काकडी, भेंडी, मका, कांदा आदी बागायती पिकांचा हंगाम ऐन बहरात असतांनाच शेतकऱ्यांवर दुसऱ्यांदा अस्मानी संकट कोसळले आहे. हातातोंडाशी आलेली पिके भुईसपाट झाल्याने बळीराजा आर्थिक संकटात सापडला आहे. त्यामुळे शासनाने तात्काळ पंचनामे करुन शेतकऱ्यांना लवकरात लवकर नुकसानभरपाई द्यावी." -सुरेश सहाणे, बागायतदार शेतकरी साकुर

Nashik Unseasonal Rain Hundreds of hectares of land were affected
Unseasonal Rain : अवकाळीने चुकविले बळीराजाचे गणित; रब्बी हंगामातील पिकावर परिणाम

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com