नांदगावसदो गावात आढळले बिबट्याचे चार बछडे; परीसरात भितीचे वातावरण

 four leopard cubs found in a house nashik marathi news
four leopard cubs found in a house nashik marathi news
Updated on

नाशिक/इगतपुरी शहर : तालुक्यातील नांदगावसदो डोंगराच्या पायथ्याजवळील शांकबरी मंदिर परीसरातील एका मोकळ्या घरात बिबट्याच्या मादीने चार बछड्यांना आणुन ठेवल्याची घटना ( ता.16 रोजी ) घरमालक राजेंद्र तांदळे यांच्या निदर्शनास आली.

याबाबत सविस्तर वृत्त असे की, नांदगावसदो येथील शेतकरी राजेंद्र तांदळे यांजी आपल्या शेतीच्या कामासाठी शेतीच्या जागेत एक घर बनवले असुन शेतीची कामे आटोपुन गावातील घरात ते रहातात. मात्र ( ता.15 रोजी ) राजेंद्र तांदळे शेती कामाचे आवजार साहित्य घेण्यासाठी शेतातील घरात आले असता सायंकाळी पाच वाजेच्या सुमारास त्यांना काही अंतरावर बिबट्या दिसुन आला तेव्हा त्यांनी वनविभागाला कळविले. 

रविवारी ता.16 रोजी सकाळी पुन्हा शेतीच्या कामा करीता घरात सामान घेण्यासाठी गेले असता त्यांना घरात चार बिबट्याचे बछडे दिसुन आले. त्यांनी तात्काळ वनविभाग अधिकारीला याबाबत माहिती दिली. माहीती समजताचं वनविभाग अधिकारीसह पथक घटनास्थळी धाव घेऊन परिसरात पाहणी करीत घरात बछडे दिसुन आल्यावर त्यांनी या परीसरात तात्काळ वनरक्षकांचा बंदोबस्त तैनात केला.तसेच आजुबाजुच्या शेतात काम करीत असलेल्या मजुरांना बाहेर केले. या घटनेमुळे परिसरात भितीचे वातावरण पसरले असुन शेतकरी व जनावरे चारणारे गुराखीही घाबरले आहेत.

या घटनेत बिबट्याची मादी बछडे घेवुन दुसरीकडे जाणार की तेथेच ठेवणार याकडे वनविभाग पथकाने नजर ठेवण्यासाठी काही अंतरावर वनरक्षक नेमले असुन पुढे या घटनेत उपाययोजना केल्या जातील असे वनक्षेत्र अधिकारी रमेश ढोमसे यांनी सांगीतले.यावेळी घटना स्थळी वनपरिक्षेत्र अधिकारी रमेश डोमसे, वनपाल अधिकारी पोपटराव डांगे, वनरक्षक के. के. हिरे, एम. बी. धादवड, वाहनचालक मुजाफर शेख, सैयद , पी. एन. वळकंदे ,आदी उपस्थीत होते.

इगतपुरी तालुक्यात पावसाचे प्रमाण जास्त असल्याने परिसरात मोठमोठे धबधबे आहेत. यात बिबट्याच्या पिलांना लपण्यासाठी सुरक्षित जागा नसल्याने या बिबट्या मादीने मोकळ्या घराचा आधार घेत हा निवारा शोधुन बछडे ठेवल्याचे दिसते. हे बछडे सुमारे 15 दिवसांचे मोठे आहेत परिसरात काही भागात मादीने पंजाने ओरबडल्याच्या खुना असुन या मोकळ्या घराचा ठीकाणा घेतला असावा. 
- राजेंद्र तांदळे, शेतकरी नांदगावसदो 

संपादन - रोहित कणसे

 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com