सहा महिन्यांत एकाच कुटुंबातील चौघांची अंत्ययात्रा

family died
family diedesakal

नाशिक : सहा महिन्यांपूर्वी हसत्या खेळत्या परिवारावर काळाचा असा घाला आला, की होत्याचे नव्हते झाले. तब्बल चार जणांचे मृत्यू झाले. काय घडले नेमके? (Four-members-of-family-died-in-six-months)

सहा महिन्यांत एकाच कुटुंबातील चौघांचे निधन

जेल रोडला चंद्रेश्वरनगर परिसरात सहा महिन्यांत एकाच कुटुंबातील चौघांचे निधनाचा दुर्दैवी अनुभव तेथील नागरिकांनी घेतला. सहा महिन्यांपूर्वी वडील, त्यानंतर एक मुलगा, आई लताबाई आणि तीन दिवसांपूर्वी आणखी एक मुलगा, अशा चार जणांच्या निधनाच्या दुर्दैवी घटनेने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. सहा महिन्यांपूर्वी कुटुंबप्रमुख वडील दिवाकर श्रावण कांबळे (वय ६५) यांचे वृद्धापकाळाने निधन झाले. ते निवृत्त कर्मचारी होते. त्यानंतर काही दिवसांत त्यांच्या पत्नी आणि मुले महेश आणि सुरेंद्र हे दोघे बंधूंचे निधन झाले. एकाच कुटुंबावरील या आघातामुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. महेश व सुरेंद्र या दोघांमागे पत्नी, अविवाहित भाऊ आणि प्रत्येकी दोन-दोन मुले आहेत.

family died
नाशिकमध्ये बससेवेला प्रवाशांचा अल्‍प प्रतिसाद
family died
अनलॉकमुळे नाशिकच्या औद्योगिक जगतात आनंदाचे वातावरण

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com