Crime : तरुणाच्या हत्त्येप्रकरणी चौघे संशयित ताब्यात | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Nashik Crime News

Crime : तरुणाच्या हत्त्येप्रकरणी चौघे संशयित ताब्यात

म्हसरूळ (जि. नाशिक) : तीन दिवसांपूर्वी दिंडोरी रोड परिसरात झालेल्या तरुणाच्या हत्त्येप्रकरणी (Murder Case) म्हसरूळ पोलिसांनी वेगाने तपासाची चक्रे फिरवून चार संशयितांना नाशिकरोड रेल्वे स्थानक, नांदूर शिंगोटे, पवननगर, त्र्यंबक रोड अशा वेगवेगळ्या ठिकाणांहून ताब्यात घेण्यास म्हसरूळ गुन्हे शोध पथकास यश मिळाले आहे. (Four suspects arrested in young boy murder case nashik crime news)

आकाश पेट्रोल पंपाजवळील वीर सावरकर उद्यानात बुधवारी (ता.१८) रात्री ९ च्या सुमारास टोळक्याने केलेल्या हल्ल्यात यश गांगुर्डे या २४ वर्षीय युवकाची हत्त्या झाली. मित्रांमध्ये सुरू असलेले वाद मिटविण्यासाठी यश गेला होता. यावेळी दुसऱ्या गटातील संशयितांनी यशवर चॉपरने पाठीवर आणि पोटावर वार करत हत्या केली. खुनाच्या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाल्याने म्हसरूळ पोलीसांनी तपास चक्रे फिरवत सूरज रणजित गांगुर्डे (२८ रा. विरा सोसायटी, वीर सावरकर गार्डन पाठीमगे, आकाश पेट्रोल पंप,दिंडोरी रोड), मयूर इंद्रराज शिवचरण (२५, रा.फ्लॅट ०७, साई मनोरथ सोसायटी, गणपती मंदिर समोर, मेहरधाम, पेठरोड), अथर्व किरण निसाळ (२१, रा.फ्लॅट न.०३, गायत्री अपार्टमेंट, इंद्रकुंड, पंचवटी), सौरभ दीपक देशमुख (१९, रा. पिकॉक हिल समोर, देशमुख वस्ती, दिंडोरी रोड) या फरार असलेल्या चौघा संशयितांना ताब्यात घेतले आहे.

हेही वाचा: Nashik : कारच्या धडकेनंतर दुचाकी जळून खाक; 1 ठार

"यांनी बजावली कामगिरी"

पोलिस आयुक्त जयंत नाईकनवरे, पोलीस उपायुक्त अमोल तांबे, सहायक पोलिस आयुक्त मधुकर गावित यांच्या आदेशानुसार म्हसरूळ पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक साखरे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस निरीक्षक सुधीर पाटील, सहायक पोलिस उपनिरीक्षक विष्णू हळदे, पोलिस नाईक सतीश वसावे, देवराम चव्हाण, पोलिस शिपाई दिनेश गुंबाडे, प्रशांत देवरे, जितू शिंदे यांनी ही कामगिरी बजावली.

हेही वाचा: शालेय साहित्याच्या भावात वाढ; पालकांची होणार दमछाक

Web Title: Four Suspects Arrested In Young Boy Murder Case Nashik Crime News

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :Nashikcrimemurder case
go to top