Nashik : कारच्या धडकेनंतर दुचाकी जळून खाक; 1 ठार | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Burnt Bike

Nashik : कारच्या धडकेनंतर दुचाकी जळून खाक; 1 ठार

नांदगाव (जि. नाशिक) : शहराजवळ असलेल्या राष्ट्रीय महामार्गाच्या (National Highway) बाह्य वळण रस्त्यावर उड्डाणपुलाजवळ दुचाकी व कार अपघातात (Accident) तिघे जण गंभीर जखमी झाले. पैकी एकाचा उपचाराला नेत असतानाच मृत्यू झाला. (Two-wheeler burnt to ashes after car crash 1 killed Nashik News)

कार- दुचाकी अपघातानंतर दुचाकीने पेट घेतला. त्यात दुचाकी पूर्णपणे भस्मसात झाली. दुपारी तीनच्या सुमाराला हा भीषण अपघात घडला. त्यातील भीषणता भयावह होती. साकोरा येथून येणारी कार (एमएच- १५- क्यूएस- ९३३०) व समोरून येणाऱ्या दुचाकीचा (एमएच- १५ डीएस ९३९०) समोरासमोर अपघात झाला. या घटनेत दुचाकी जळून खाक झाली. अपघातग्रस्त दुचाकी कळमदरी येथील युवकाची आहे. दुचाकीवरील गंभीर जखमींना तातडीने नांदगावच्या ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यांची प्रकृती अत्यवस्थ असल्याने पुढील उपचारासाठी मालेगावला हलविण्यात आले. मालेगावला जात असताना समाधान गायकवाड या जखमी युवकाचा मृत्यू झाला. या घटनेतील दुसरा गंभीर जखमी विलास धोत्रेला मालेगावला हलविण्यात आले आहे. कारचालक नाशिक येथील असून, त्यात तीन प्रवासी होते. त्यांना या घटनेत दुखापत झाली नाही. हवालदार राजू मोरे तपास करीत आहे.

हेही वाचा: Nashik : दुचाकी वाहनासाठी नविन मालिका सुरू

कुटुंबातील कर्त्या पुरूषावर काळाचा घाला
समाधान जगलू गायकवाड (वय २८) हा इंदिरानगर कळमदरी (ता. नांदगाव) येथील रहिवाशी असून, त्याची घरची आर्थिक परिस्थिती हलाखीची आहे. मोलमजुरी करून तो कुटुंबाचा उदरनिर्वाह करत असे. त्याचा मागीलवर्षी विवाह झाला होता. समाधानचा स्वभाळ मनमिळाऊ होता. ऐन उमेदीच्या कळात समाधानच्या अपघाती मृत्युची बातमी गावात पसरतात हळहळ व्यक्त करण्यात आली. दरम्यान, सदर अपघात समोरासमोर झाला की, कारने दुचाकीला पाठीमागून धडक दिली, याबाबत चर्चा सुरू होती.

हेही वाचा: शालेय साहित्याच्या भावात वाढ; पालकांची होणार दमछाक

Web Title: Two Wheeler Burnt To Ashes After Car Crash 1 Killed Nashik News

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..