esakal | नाशिक : स्वयंघोषित महाराजांच्या भोंदूगिरीचा भांडाफोड! पोलिसांची अपार्टमेंटमध्ये धडक
sakal

बोलून बातमी शोधा

superstition

नाशिक : स्वयंघोषित महाराजांच्या भोंदूगिरीचा भांडाफोड!

sakal_logo
By
कुणाल संत

नाशिक : शहरातील गंगापूर रोडवरील (gangapur road) उच्चभ्रू वस्तीत स्वयंघोषित महाराजांच्या भोंदूगिरीचा अंनिसने (superstition) भांडाफोड करून भोंदूबाबाविरुद्ध पोलिस ठाण्यात तक्रार दिली. त्यावरून पोलिसांनी महाराजाला ताब्यात घेतले. काय घडले नेमके?

स्वयंघोषित महाराजांच्या भोंदूगिरीचा भांडाफोड

गंगापूर रोडवरील सुमंगल अपार्टमेंटमधील तिसऱ्या मजल्यावर स्वयंघोषित गणेश महाराजाने दुकान मांडले होते. अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या पदाधिकाऱ्यांनी या महाराजाकडे महिला व तिच्या पतीला तयारीनिशी पाठविले. त्यांच्यासोबत इतर पदाधिकारीही गेले. महिलेने बाबाची भेट घेत मला मूलबाळ होत नसल्याने सासरचे लोक त्रास देत आहेत. मला मूल होईल, यासाठी उपाय सांगा, असे सांगितले. यावर संशयित गणेश महाराजने महिलेस यावर उपाय नक्की आहे. तुला नक्की मूल होईल. यासाठी एक पूजा करावी लागेल. त्यासाठी ५० हजार रुपये खर्च असल्याचे सांगितले. यावर महिलेने त्यास होकार दिल्यानंतर पूजा करण्याचा दिवस ठरविला. नंतर संबंधित महिलेने बाबांना दक्षिणा देऊन थेट गंगापूर पोलिस ठाणे गाठत गणेश महाराजविरुद्ध तक्रार दिली. पोलिसांनी सुमंगल अपार्टमेंटमध्ये धडक मारत गणेश महाराज यास ताब्यात घेतले. या वेळी अंनिसचे डॉ. ठकसेन गोराणे, ‘आप’चे जितेंद्र भावे, समीर शिंदे, महेंद्र दातरंगे, कस्तुरी आटवणे, जगदीश आटवणे, सोमा कुऱ्हाडे, राजेंद्र गायधनी, प्रतीक पवार उपस्थित होते.

हेही वाचा: नांदगाव : पुराच्या पाण्याने शहराला वेढले

‘अंनिस’च्या तक्रारीवरून पोलिसांकडून अटक; ५० हजारांची मागणी

जामनेर येथील गणेश महाराज भोंदूबाबा असून, त्यांची हाय प्रोफाइल टोळी आहे. उच्चप्रतीचे वाहने वापरणे, विमानाने प्रवास करणे, उच्चभ्रू लोकांसाठी इंग्रजी वृत्तपत्रात जाहिराती देऊन फसविणे, असे त्यांचे काम आहे. त्यामुळे या भोंदूबाबाचा पर्दाफाश अंनिसने केला आहे. महाराजांकडून कुणाची फसवणूक झाली असल्यास महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीशी संपर्क साधावा. -कृष्णा चांदगुडे, पदाधिकारी, अंनिस

हेही वाचा: आरोग्यसेविकांची पदे कायम; केंद्र सरकारचा निर्णय

loading image
go to top