Nashik Fraud Crime : फ्लॅटच्या व्यवहारापोटी 24 लाखांची फसवणूक | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Crime

Nashik Fraud Crime : फ्लॅटच्या व्यवहारापोटी 24 लाखांची फसवणूक

सिडको (जि. नाशिक) : इंडियन एअरलाइंसमध्ये नोकरीला असल्याचे बनावट ओळखपत्र व फ्लॅट विक्रीसाठी इंडियन एअरलाईन्सची बनावट कागदपत्रे दाखवून पाच जणांनी मिळून तिघांची २४ लाख रुपयांनी फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.

याबाबत कैलास शांताराम महाजन (रा. चर्चच्या मागे, मालेगाव कॅम्प) यांना दिलेल्या तक्रारीवरून अंबड पोलिसांत गुन्हा दाखल झाला आहे. (Fraud of 24 lakhs due to flat transaction Nashik Crime news)

तक्रारीत म्हटले आहे की, श्री. महाजन यांना फ्लॅट घ्यायचा होता. या दरम्यान संजय गोसावी, भीमा धोंडिबा वाघमारे (रा. यश विहार अपार्टमेंट, पवननगर), छाया आव्हाड, प्रशांत आव्हाड व आनंद भट्टड (सर्व रा. नाशिक) यांनी संपर्क साधला.

त्यांनी महाजन यांना राणेनगरमधील समर्थ हॉस्पिटलच्या मागे, प्रजापिता ब्रह्माकुमारी सेंटरजवळ असलेले इंडियन एअरलाईन्स कंपनीचे जुने फ्लॅट दाखविले. तर, संजय गोसावी यांनी आपण इंडियन एअरलाईन्समध्ये नोकरीला असल्याचे सांगत बनावट ओळखपत्र दाखवले.

तसेच, फ्लॅट विक्रीचे संपूर्ण अधिकार कंपनीने आपल्याला दिले असल्याचे सांगितले. त्यावर विश्‍वास ठेऊन महाजन यांनी संबंधीतांसोबत फ्लॅटचा व्यवहार करून इसार पावती व करारनामा केला. तसेच, या सर्वांनी बनावट कागदपत्रे दाखवून महाजन यांच्याकडून वेळोवेळी दहा लाख रुपये घेतले.

हेही वाचा : देशातले ३२ म्युच्युअल फंडांचं व्यवस्थापन आहे महिलांच्या हाती...

त्याचप्रमाणे महाजन यांचे मावसभाऊ किरण बिरारी यांच्याकडूनही फ्लॅटच्या मोबदल्यात ८ लाख ५० हजार रुपये आणि संदीप बोरसे यांच्याकडूनही ५ लाख ५० हजार रुपये उकळले असल्याचेही तक्रारीत म्हटले आहे.

१ नोव्हेंबर २०२० ते १३ मार्च २०२० या कालावधीत हा प्रकार घडला आहे. या काळात वारंवार विचारणा केली असता त्यांनी महाजन व इतर तिघांना उडवाउडवीची उत्तरे देऊन पैसे देण्यास नकार दिला. या प्रकरणी अंबड पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला असून, पोलीस उपनिरीक्षक शेवाळे तपास करीत आहेत.