नाशिकच्या व्ही. एन. नाईक संस्थेत नोकरीचे आमिष दाखवत फसवणूक | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

v.n.naik institute

नाशिकच्या व्ही. एन. नाईक संस्थेत नोकरीचे आमिष दाखवत फसवणूक

नाशिक : व्ही. एन. नाईक संस्‍थेत (V.N.Naik institute) नोकरी लावून देण्याचे आमिष दाखवत सुशिक्षित बेरोजगारांची आर्थिक फसवणूक (fraud) करणाऱ्याविरोधात सरकारवाडा पोलिस ठाण्यात गुन्‍हा दाखल झाला आहे. अनेक सुशिक्षित बेरोजगारांना व्‍ही. एन. नाईक संस्‍थेत नोकरी लावण्याच्‍या मोबदल्यात लाखो रुपयांची फसवणूक केल्‍याचा संशय व्‍यक्‍त होत आहे. (Fraud showing job lure in V N Naik organization)

व्ही. एन. नाईक संस्थेत नोकरीचे आमिष दाखवत फसवणूक

दत्ता शिवाजीराव आव्हाड (रा. मऱ्हळगोई, ता. निफाड व सध्या मुक्‍काम खुटवडनगर) असे संशयिताचे नाव आहे. संशयिताने अनेक सुशिक्षित बेरोजगारांना व्‍ही. एन. नाईक संस्‍थेत नोकरी लावण्याच्‍या मोबदल्यात लाखो रुपयांची फसवणूक केल्‍याचा संशय व्‍यक्‍त होत आहे. या संदर्भात व्‍ही. एन. नाईक शिक्षण संस्‍थेचे सरचिटणीस हेमंत धात्रक यांनी फिर्याद दिली आहे. धात्रक ‍यांनी दिलेल्‍या फिर्यादीनुसार संशयित दत्ता आव्‍हाड याचा व्‍ही. एन. नाईक संस्‍थेशी संबंध नाही. असे असतानाही त्याने संस्थेसोबत संबंध असल्याचे भासवत संस्थेच्या नावाचा दुरुपयोग केला. काही बेरोजगारांना संस्थेत नोकरी लावून देण्याचे आमिष दाखवत फसवणूक केली. त्यानुसार वर्षा प्रशांत सातवेकर यांच्याकडून एक लाख रुपये, तर अन्‍य काहींना लाखोंचा गंडा घातल्‍याचे निदर्शनास आले आहे. या संदर्भात माहिती झाल्‍यावर धात्रक यांनी सरकारवाडा पोलिस ठाण्यात फिर्याद दिली.

टॅग्स :crime