esakal | पीपीई किट घालून महिलेवर अंत्यसंस्कार; कौतिकापाडेच्या सरपंचाने जपली माणुसकी

बोलून बातमी शोधा

Nashik News
पीपीई किट घालून महिलेवर अंत्यसंस्कार; कौतिकापाडेच्या सरपंचाने जपली माणुसकी
sakal_logo
By
गोविंद अहिरे


नरकोळ (जि. नाशिक) : कौतिकपाडे (ता. बागलाण) येथील सरपंचाने गावातील निराधार असलेल्या आणि कोरोनामुळे मृत्यू झालेल्या महिलेवर अंत्यसंस्कार केले. त्यांच्या या धाडशीपणाचे कौतुक होत आहे. कोरोना काळात माणुसकी जपल्याचा संदेश त्यांनी दिला आहे.

बागलाण तालुक्यातील कौतिकपाडे येथील मीराबाई दातरे यांचे कोरोनामुळे निधन झाल्याने त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्याचा प्रश्‍न उपस्थित झाला. अशा परिस्थितीत सरपंच राजेंद्र जाधव यांनी पीपीई किट घालून त्या महिलेवर अंत्यसंस्कार केले. त्याच दिवशी गावातील निराधार व्यक्ती नथूसिंग लाला पवार यांचेदेखील अपघाती निधन झाले होते. त्यांना सटाणा ग्रामीण रुग्णालयात घेऊन जाणे, त्यांचे विच्छेदन करून त्यांच्यावरही अंत्यसंस्कार आदी विधी जाधव यांनी केले. मृत व्यक्ती निराधार असल्याने त्यांना पाणीदेखील दिले. गावातील प्रत्येक कुटुंबाला सॅनिटायझरचे वाटप करण्यात आले. औषध फवारणीसाठी ग्रामपंचायतीला कायमस्वरूपी पंप खरेदी करून दिला. मराठी शाळेत दोन खोल्यांमध्ये विलगीकरण कक्ष तयार केला.

हेही वाचा: मुले असूनही ती ठरली बेवारस! ओझरकरांनी माणुसकी दाखवत केले अंत्यसंस्कारसरपंच झालो म्हणजे फक्त राजकारण न करता आपण समाजाचे काही देणे लागतो, हा दृष्टिकोन डोळ्यांसमोर ठेवून आपण अंत्यसंस्कारासाठी पुढे आलो. निराधारांना आधार देणे, हे माझे कर्तव्य समजतो.
-राजेंद्र जाधव, सरपंच, कौतिकपाडे

हेही वाचा: कोविड सेंटरच्या पायरीवर सोडला रुग्णाने प्राण! चांदवडच्या व्हायरल VIDEO मागचं सत्य..