Leopard
sakal
जुने नाशिक: गडकरी चौक परिसरातील विशेष पोलिस महानिरीक्षक कार्यालय आणि शासकीय निवासस्थान परिसरात बिबट्याचे शुक्रवारी (ता. १२) पहाटे साडेचारला दर्शन झाले. संबंधित घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. पोलिस आणि वन विभागाकडून कार्यालय, निवासस्थान, त्यामागील पोलिस उपायुक्त कार्यालय आणि वन विभाग कार्यालय आवारात सर्च ऑपरेशन करण्यात आले; परंतु बिबट्या आढळून आला नाही.