Galyukt Shivar Yojana
sakal
नाशिक: धरणांची साठवण क्षमता वाढविणे आणि काढलेला गाळ शेतजमिनींना सुपीक करण्यासाठी उपलब्ध करणे हा गाळमुक्त धरण- गाळयुक्त शिवार योजनेचा प्रमुख उद्देश आहे. या अभियानाची यशस्वीपणे अंमलबजावणी करण्यासाठी प्रत्येक तालुक्यात प्रभावी जनजागृती करावी, असे स्पष्ट निर्देश अपर जिल्हाधिकारी हेमांगी पाटील यांनी दिले.