नाशिक: शहर-जिल्ह्यात बुधवारी (ता. २७) लाडक्या गणरायाची घरोघरी प्रतिष्ठापना होणार आहे. त्यामुळे आगामी दहा दिवस शहर-जिल्ह्यात भाविकांमध्ये उत्साह राहणार आहे. तर याच दरम्यान बकरी ईदही आहे. त्यामुळे यादरम्यान कोणताही अनुचित प्रकार घड नये, शहर-जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी शहर आणि ग्रामीण पोलिस दलाकडून कडेकोट पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आलेला आहे. गुन्हे शाखा व गोपनीय विभागाकडून सार्वजनिक व गर्दीच्या ठिकाणी करडी नजर ठेवली जात आहे. यासाठी अतिरिक्त फौजफाटाही सज्ज आहे.