Ganesh festival
sakal
नाशिक: पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करण्याच्या महापालिकेच्या उपक्रमांतर्गत श्री गणेशमूर्ती थेट नदी पाण्यात विसर्जित न करता दान करण्याचे आवाहन करण्यात आले होते. त्यानुसार या वर्षी दोन लाख २६ हजार १७७ मूर्ती भाविकांनी महापालिकेच्या मूर्ती संकलन केंद्राकडे दिल्या. मागील वर्षी एकूण दोन लाख पाच हजार ८५४ मूर्तींचे संकलन करण्यात आले.