drowning
sakal
नाशिक: उत्तर महाराष्ट्रात एकीकडे गणेश विसर्जन शांततेत सुरू असताना दुसरीकडे या सोहळ्याला गालबोट लागले. जळगाव जिल्ह्यात विसर्जनावेळी बुडाल्याने एकाचा मृत्यू झाला असून, दोघे वाहून गेले आहेत. नाशिक जिल्ह्यात दोघांचा मृत्यू, तर दोन जण वाहून गेले. बुडालेल्या तिघांचे मृतदेह सापडले असून, वाहून गेलेल्या चौघांचा शोध सुरू आहे. धुळे जिल्ह्यात विसर्जनाहून परत येत असताना झालेल्या अपघातात दोन तरुणांचा मृत्यू झाला आहे.