नाशिक: अवघ्या काही दिवसांवर लाडक्या गणरायाचे आगमन होणार असून, त्या पार्श्वभूमीवर शहरातील गणेश मंडळांची लगबग सुरू झाली आहे, तर गणेशोत्सव काळात कोणताही अनुचित प्रकार घडू नये, विसर्जन मिरवणूक निर्विघ्न पार पडावी या दृष्टिकोनातून पोलिस आयुक्तालयाकडूनही उपाययोजना राबविल्या जात आहेत. त्यातच विसर्जन मिरवणुकीत सहभागी मंडळांना गणरायाचे विसर्जन वेळेत करता यावे, यासाठी मिरवणुकीत सहभागी असलेल्या वाहनांच्या संख्येवर मर्यादा आणण्याचे संकेत पोलिस आयुक्तालयाने दिले आहेत.