पावसामुळे गणेशभक्तांची तारांबळ; बाप्पांच्‍या दर्शनाची भाविकांमध्ये ओढ

heavy rain
heavy rainesakal
Updated on

नाशिक : गणेशोत्‍सवाला धुमधडाक्‍यात सुरवात झाल्‍यानंतर उत्‍सवाच्‍या दुसऱ्या दिवशी मंडळाकडून देखावे साकारण्याची लगबग सुरू राहिली. भाविकांना बाप्पाच्‍या दर्शनाची ओढ लागलेली असताना सार्वजनिक मंडळाचे देखावे पाहण्यासाठी तुरळक गर्दी होत होती. त्‍यातच सायंकाळी पावसाने हजेरी लावल्‍याने भाविकांची तारांबळ उडाली होती. (Ganesha devotees flock due to heavy rain Nashik News)

उत्‍सवाचा दुसराच दिवस असल्‍याने अनेक छोट्या मंडळांकडून देखावा साकारण्याची लगबग सुरू राहिली. वेगवेगळ्या सामाजिक विषयांवर देखावे साकारण्यात येत होते. गुरुवारी (ता. १) दुपारी चारपासून सार्वजनिक मंडळांभोवती गर्दी होण्यास सुरवात झालेली होती. परंतु, पाचच्‍या सुमारास शहरासह उपनगरी भागांमध्ये पावसाने जोरदार हजेरी लावली.

त्‍यामुळे भाविकांची धावपळ झाली. सायंकाळी उशिरापर्यंत रिमझिम सुरु राहिल्‍याने गर्दीवर त्‍याचा परिणाम झाला होता. येत्‍या दोन-तीन दिवसांत देखावे पाहण्यासाठी भाविकांची गर्दी होण्याची शक्‍यता आहे. कौटुंबिक स्‍तरावर गणेशोत्‍सवाचा उत्‍साह बघायला मिळतो आहे. सकाळी व सायंकाळची बाप्पांची आरती धुमधडाक्‍यात करताना विशेष असा प्रसाद भाविकांकडून साकारला जातो आहे.

heavy rain
Rain Update : गणेशोत्सवाच्या दुसऱ्या दिवशीही धो-धो पाऊस

गणरायाचे देखणे रुप सोशल मीडियावर शेअर करण्यात येत असल्‍याने, विविध सोशल नेटवर्किंग साईट्‌सवरील वातावरण बाप्पामय झाले होते. उत्‍सवाचे दिवस उलटत असताना, भाविकांचा उत्‍साहदेखील वाढत जाणार आहे.

भव्‍य रुप वेधतेय लक्ष

गणरायाचे भव्‍य रुप पाहण्याबाबत भाविकांमध्ये आकर्षण बघायला मिळते आहे. श्रींची मोठी मुर्ती असलेल्‍या मंडळांच्‍या मंडपात भाविकांची गर्दी होते आहे. अनेकांकडून बाप्पाचे छायाचित्र टिपताना आठवणी संग्रहित करण्यावर भर दिला जात आहे.

heavy rain
वारली चित्रकलेची मोडी लिपीत माहिती; श्रद्धा कराळे यांनी नोंदविला रेकॉर्ड

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com