Latest Marathi News | गणेशोत्सवाची सातासमुद्रापार कॅलिफोर्नियात धुम! | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Gacchi Family

गणेशोत्सवाची सातासमुद्रापार कॅलिफोर्नियात धुम!

पिंपळगाव बसवंत (जि. नाशिक) : भारतात सुरू असलेला गणेशोत्सव आता जगाच्या कानाकोपऱ्या उत्साहात साजरा केला जात आहे. कॅलिफोर्नियातील शांताक्लारा शहरात नाशिकची माहेरवाशीण असलेली प्रणीता गच्ची (मुंगीकर) या पाच वर्षांपासून सर्व जातिधर्माच्या भाविकांना एकत्र करून गणेशोत्सव साजरा करतात. सातासमुद्रापार कॅलिफोर्नियात गणेशोत्सवाची धूम दिसत आहे. (Ganeshotsav 2022 in California across gacchi Family nashik Latest Marathi News)

नाशिकचे निवृत्त जलसपंदा अधीक्षक वसंतराव मुंगीकर यांची कन्या प्रणीती गच्ची व जावई लक्ष्मीकांत गच्ची आयटी इंजिनिअर असून कॅलिफोर्नियात नोकरीनिमित्त वास्तव्याला आहेत. प्रणीती या उच्चशिक्षीत असल्या, तरी आपल्या कुटुंबाकडून मिळालेल्या धार्मिकतेच्या देणगीमुळे त्यांनी कॅलिफोर्नियातही लाडक्या बाप्पाची आराधना सुरू ठेवली आहे. तेथील अन्य भारतीयांनाही त्या बोलावून प्रसादाचे वाटप करतात. गणेश चतुर्थीसाठी भारतातून मूर्ती मागवून श्रद्धेने पूजा व आरती केली जाते.

कॅलिफोर्नियात गणेशमंदिर नसल्याने तेथील महाराष्ट्रीयन लोक गच्ची कुटुंबीयांकडे बाप्पाच्या दर्शनाला येतात. तेथे भजन, पूजा व आरतीत ते रममाण होतात. गच्ची कुटुंबातील शुभाकांत गच्ची, लिलाबी गच्ची, ह्दय व रिद्धी गच्ची हे अतिशय आनंदाने रोज भाविकांचे स्वागत करतात. सुट्टीच्या दिवशी भाविकांची संख्या अधिक असते.

हेही वाचा: मालेगावी गोल्डन नगरात तरुणाचा खून; दोघा संशयितांना अटक

गणपतीची पूजा, आरती करून विविध भजने म्हटली जातात. गच्ची कुटुंब मुळचे मुंबई येथील आहे. नाशिकच्या सुनबाईचा विघ्नहर्त्याची स्थापना करण्याचा आग्रह त्यांनी मान्य केला. आणि कॅलिफोर्नियात बाप्पाच्या आगमनाने मंगलमय वातावरण झाले आहे.

गणपतीला रोज मोदकांचा नैवेद्य दाखविला जातो. यांसह विविध प्रकारचे लाडू, मिठाई प्रसाद म्हणून वाटप केली जाते. गणेशोत्सवाचे दहा दिवस गच्ची कुटुंब कॅलिफोर्नियाच्या शांताक्लारा शहरात मोठ्या आनंदाने व भक्तीभावाने साजरे करतात. यात सर्व जातीधर्माचे लोक सहभागी होतात, हे विशेष.

"कन्या प्रणीती ही धार्मिक स्वभावाची मुलगी आहे. सासरी व नंतर परदेशात जाऊनही तिचा देवावरचा विश्‍वास अढळ राहीला. दहा दिवस गणरायाच्या भक्तीत गच्ची कुटुंब तल्लीन असते. काही वेळेला मीही ऑनलाईन आरतीत सहभागी होत असतो."-वसंतराव मुंगीकर, नाशिक

हेही वाचा: शहरातील सराईत गुन्हेगार जेरबंद; गावठी पिस्तुल, 2 जिवंत काडतूस जप्त

Web Title: Ganeshotsav 2022 In California Across Gacchi Family Nashik Latest Marathi News

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..