नाशिक: गणेशोत्सवाचा उत्साह शिगेला पोचला असून, रविवारी (ता. ३१) सुटीनिमित्त भाविकांची वर्दळ वाढली होती. मध्यवर्ती भागात गर्दीने उच्चांक गाठला होता. शहर परिसरातील प्रमुख रस्ते भाविकांनी गजबजले होते. अनेकांनी सहकुटुंब देखावे पाहण्यासाठी गर्दी केली होती. मात्र अधून-मधून बरसणाऱ्या सरींनी भाविकांची काहीशी तारांबळ उडविली.