नाशिक: आगामी गणेशोत्सवात देखावे खुले ठेवण्यासाठी रात्री बारापर्यंत परवानगी मिळावी व मिरवणुकीतील शेवटच्या मंडळाचा गणपती मूर्तीचे विसर्जन होईपर्यंत पारंपरिक वाद्यांसह मिरवणूक सुरू ठेवण्यास परवानगी मिळावी. या सर्व गणेश मंडळांच्या मागण्या प्रशासनासमोर मांडण्याचा निर्धार शुक्रवारी (ता.१) झालेल्या गणेशोत्सव महामंडळाच्या बैठकीत करण्यात आला.