नाशिक: गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर भाविकांना रात्री उशिरापर्यंत देखावे पाहता यावेत यासाठी अखेरचे चार दिवस मध्यरात्री बारापर्यंत गणेश मंडळांना आरास व देखावे खुले ठेवण्यास पोलिसांकडून परवानगी देण्यात आली आहे. एरवी रात्री १० नंतर देखाव्यांसह ध्वनिक्षेपकांवरही बंदी असते. मात्र शेवटचे तीन दिवस मध्यरात्रीपर्यंत भाविकांना देखावे पाहण्याचा आनंद लुटता येणार आहे. त्याचवेळी ध्वनी मर्यादेचा भंग, तसेच लेझर लाइटचा वापर केल्यास संबंधित मंडळावर जागेवर गुन्हा दाखल करत कठोर कारवाईचा इशारा पोलिसांनी दिला आहे.