नाशिक: ‘श्री’ गणरायाच्या आगमनाने येथील बाजारपेठेला बूस्टर डोस मिळाला आहे. गणेशोत्सवाच्या माध्यमातून रिअल इस्टेट, वाहन खरेदी-विक्री, मिठाई, इलेक्ट्रॉनिक्स बाजारपेठेत सुमारे दोनशे कोटींची उलाढाल शहरात झाली आहे. समाधानकारक पाऊस, सण-उत्सवांच्या मोसमात विविध योजनांचा लाभ उठवत बाजारपेठेत चैतन्याचे वातावरण असून, दिवाळीपर्यंत चैतन्याचा हा ट्रेंड कायम राहील.