फोटो : A15058
नाशिक : द्वितीय पुरस्कारप्राप्त सोमवार पेठ येथील वेलकम सहकार्य मित्रमंडळ.
--
सोमवार पेठचे गणेश मंडळ
गणेशोत्सव स्पर्धेत द्वितीय
सकाळ वृत्तसेवा
जुने नाशिक, ता. २२ : राज्य सरकारतर्फे सार्वजनिक गणेशोत्सव स्पर्धेत इगतपुरी येथील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ किल्ले कावनईने प्रथम, तर जुने नाशिक येथील सोमवार पेठमधील वेलकम सहकार्य मित्रमंडळ द्वितीय, तर नांदगावच्या श्री नीलमणी गणेश मंदिर पब्लिक ट्रस्टने तृतीय क्रमांक पटकाविला. विजेत्यांना शुक्रवारी (ता. १६) मुंबई येथे पुरस्कार वितरण करण्यात आले.
आंतरराष्ट्रीय ३, राष्ट्रीय,३, राज्यस्तरीय ३, जिल्हास्तरीय ९४ आणि तालुकास्तरीय ३८ आशा १४१ सार्वजनिक मंडळांची स्पर्धेत निवड करण्यात आली होती. जिल्हास्तरीय स्पर्धेत जिल्हानिहाय तीन पुरस्कार वितरित करण्यात आले. सोमवार पेठ भागातील वेलकम सहकार्य मित्रमंडळाने जिल्ह्यातून द्वितीय क्रमांक मिळाला. तर इगतपुरी येथील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ किल्ले कावनईने प्रथम आणि नांदगावच्या श्री नीलमणी गणेश मंदिर पब्लिक ट्रस्टने तृतीय क्रमांक पटकाविला. १४ ते २५ सप्टेंबर कालावधीत झालेल्या स्पर्धेतील विजेत्यांची निवड संबंधित समित्यांच्या शिफारशीनुसार करण्यात आली. आंतरराष्ट्रीय, राष्ट्रीय, राज्यस्तरीय, जिल्हास्तरीय आणि तालुकास्तरीय अशा एकूण १४१ मंडळांची विजेते म्हणून निवड जाहीर करण्यात आली. विजेत्या मंडळांना पारितोषिकाची रक्कम आणि प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. शुक्रवारी मुंबईतील प्रभादेवी येथील रवींद्र नाट्य मंदिरात पारितोषिक वितरण कार्यक्रम झाला.
आंतरराष्ट्रीय स्तरावर हाँगकाँग येथील महाराष्ट्र मंडळाने प्रथम, जपानमधील एडोगावा इंडिया कल्चर सेंटरने द्वितीय, तर जर्मनीतील हेसन इंडियन लेडीज असोसिएशन ॲन्ड पायोनिअर इंडियन्स ई.व्ही मंडळाने तृतीय क्रमांक मिळविला.