नाशिक- पाच दिवसांपासून नाशिकसह त्र्यंबकेश्वर परिसरात सुरू असलेल्या संततधारेनंतर गोदावरीच्या पाणीपातळीत पुन्हा वाढ झाली आहे. गंगापूर धरणातून सोमवारी (ता. २३) दुपारी केलेल्या विसर्गानंतर गोदावरी पुन्हा दुथडी वाहू लागली आहे. दरम्यान, रात्रीतून पाणी वाढण्याची शक्यता लक्षात घेऊन व्यावसायिकांची दिवसभर टपऱ्या हटविण्याची लगबग सुरू होती.