नाशिक: शहर पोलिस आयुक्तालय हद्दीत ३१ सार्वजनिक गणेश मंडळांकडून मौल्यवान गणपतींची स्थापना करण्यात आलेली आहे. या गणपतींच्या सुरक्षिततेसाठी सीसीटीव्हींची करडी नजर आहेच. शिवाय, पोलिसांच्या बंदोबस्तासह मंडळांच्या स्वयंसेवकांचाही कडेकोट पहाराही ठेवण्यात आलेला आहे.