सिंधी-जैन समाजाचा आज गरबा सोहळा

सिंधी-जैन समाजाचा आज गरबा सोहळा
Published on: 
संक्षिप्त सिंधी-जैन समाजाचा आज गरबा सोहळा जळगाव : सिंधी व जैन समाजातील बांधवांमध्ये सामाजिक स्नेह, आपुलकी आणि एकोपा वाढविण्याच्या उद्देशाने जैन सोशल ग्रुप यांच्या संयुक्त विद्यमाने भव्य गरबा डान्स सोहळ्याचे रविवारी (ता.४) आयोजन केले आहे. सायंकाळी साडेपाचला सागर पार्क येथे हा कार्यक्रम होणार आहे. कार्यक्रमास बाबा हरदासराम पूज्य सिंधी पंचायत यांचे सहकार्य लाभणार आहे. सिंधी व जैन समाजबांधवांनी सहभाग घ्यावा, असे आवाहन आयोजकांनी केले आहे. ---- ॲथलेटिक्स खेळाडूंशी उपमहापौरांचा संवाद जळगाव : क्रीडा व युवक सेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य, पुणे व जिल्हा क्रीडा कार्यालय, जळगाव अंतर्गत मिशन लक्षवेध योजनेच्या जिल्हा क्रीडा प्रतिभा विकास केंद्रातील ॲथलेटिक्स खेळाडूंशी उपमहापौर व विद्यापीठ खेळाडू मनोज चौधरी यांनी छत्रपती श्री शिवाजी महाराज जिल्हा क्रीडा संकुल येथे संवाद साधला. यावेळी जिल्हा क्रीडा अधिकारी दिलीप दिघे, महाराष्ट्र राज्य ॲथलेटिक्स असोसिएशनचे उपाध्यक्ष राजेश जाधव, क्रीडा अधिकारी सचिन निकम, जळगाव जिल्हा ॲथलेटिक्स असोसिएशनचे मुख्य प्रशिक्षक व नायब तहसीलदार अनिल पठाडे, राष्ट्रीय खेळाडू संजय मोती, केंद्राचे मुख्य प्रशिक्षक दशरथ जाधव, मनिष भंडारी व सुधाकर सपकाळे उपस्थित होते. यावेळी खेळाडूंशी संवाद साधून प्रशिक्षण, स्पर्धेची तयारी आणि क्रीडा क्षेत्रातील संधींबाबत मार्गदर्शन करण्यात आले. ........ जुने बी.जे. मार्केट परिसरात पथदीप बंद जळगाव : शहरातील जुने बी. जे. मार्केटसमोरील मुख्य रस्त्यावर गेल्या काही दिवसांपासून पथदीप बंद आहेत. त्यामुळे हा रस्ता अंधारात असल्याने रस्त्यातील खड्डे वाहनचालकांना दिसत नसल्याने अपघात होत आहे. तसेच रस्त्याच्या वळणावर मालवाहतूक गाड्या उभ्या राहतात. या गाड्या अंधारात दिसत नसल्याने अपघात होण्याची शक्यता आहे. त्यामुळे महापालिकेने त्वरीत पथदीप सुरू करावे, अशी मागणी नागरिक तसेच दुकानदारांकडून होत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com