पाथर्डीच्या 350 घरांना MNGLच्या पाइपलाइनने गॅसपुरवठा

MNGL latest Marathi News
MNGL latest Marathi Newsesakal

नाशिक : मुंबई, पुणे, नागपूर, ठाणे पाठोपाठ आता नाशिक शहरातदेखील पाईपलाईनच्या (Pipeline) माध्यमातून स्वयंपाकाच्या गॅसचा (Gas Supply) पुरवठा सुरू झाला आहे. महाराष्ट्र नॅचरल गॅस कंपनीकडून (MNGL) पाथर्डी फाटा भागात साडेतीनशे घरांना नुकताच गॅसपुरवठा सुरू करण्यात आला आहे.

ऑक्टोबर महिन्यापर्यंत साडेसहा हजार घरांना गॅसपुरवठा सुरू करण्याचे उद्दिष्ट निश्‍चित करण्यात आले आहे. आतापर्यंत एक लाख १४ हजार जोडण्या किचनपर्यंत पोचल्याची माहिती एमएनजीएल कंपनीच्या सूत्रांनी दिली. (Gas supply to 350 houses of Pathardi through MNGL pipeline nashik Latest Marathi News)

महाराष्ट्र नॅचरल गॅस लिमिटेड कंपनीमार्फत शहरात घरोघरी स्वयंपाकाचा गॅस पुरविण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. शहरात सध्या दीडशे किलोमीटरची पाइपलाइन टाकण्यात आली आहे.

पावसाळ्यामुळे खोदाईचे काम बंद करण्यात आले आहे. एकूण २०५ किलोमीटर लांबीच्या रस्त्यांची गॅस पाइपलाइनसाठी खोदाई केली जाणार आहे. खोदाईसाठी एमएनजीएल कंपनीने महापालिकेला ८० कोटी रुपये रस्ते दुरुस्ती शुल्क अदा केला आहे.

नॅचरल गॅससाठी एमएनजीएल कंपनीने आडगाव ट्रक टर्मिनल, मालेगाव स्टॅन्ड, पाथर्डी फाटा, विल्होळी नाका या चार स्टेशनसाठी महापालिकेकडून पंधरा वर्षांसाठी जागेचा करार केला. येथे सीएनजी युनिट, रिफलिंग केले जात आहे.

विल्होळी नाका येथे स्टेशन उभारणीचे काम पूर्ण झाल्याने तसेच पाथर्डी भाग विल्होळीपासून नजीक असल्याने साडेतीनशे घरांना पहिल्या टप्प्यात नॅचरल गॅस पुरवठ्याचे काम सुरू झाले आहे.

ऑक्टोबर अखेरपर्यंत साडेसहा हजार घरांमध्ये गॅसचा पुरवठा करण्याचे उद्दिष्ट आहे. आतापर्यंत एक लाख चौदा हजार घरांपर्यंत पाइपलाइन पोचली आहे. कोरोनामुळे दोन वर्ष प्रकल्प लांबला होता. पाइपलाइन नॅचरल गॅसचे कनेक्शन देताना मागेल त्याला गॅस दिला जाणार आहे. कंपनीकडे नोंदणी झाल्यानंतर तातडीने जोडणी दिली जाणार आहे.

MNGL latest Marathi News
जि.प. आणि पं. स. निवडणुकीसाठीच्या प्रारूप मतदार यादी हरकती 25 जुलैपर्यंत

पाइपलाइन नॅचरल गॅसची वैशिष्टे

- एलपीजी गॅसपेक्षा दर कमी.

- घरोघरी सिलिंडर पोचविण्याची पद्धत होणार बंद.

- पाणी मीटरप्रमाणे वापरानुसार होणार बिलिंग

- स्फोटक गॅस नसल्याने धोके कमी

- चोवीस तास गॅस उपलब्ध

- हाताळण्यास सोपे

या मार्गावर मुख्य पाइपलाइन

शहरात पाइपलाइनद्वारे गॅसपुरवठा करताना रस्ते खोदकाम सुरू करण्यात आले आहे. पहिल्या टप्प्यात सिडकोतील पाथर्डी फाटा सर्कल येथे ९२३ मीटर, आनंदनगर ५,२०८ मीटर, ज्ञानेश्वरनगर भागात ५,६८९, पाथर्डी रस्त्यावरील पांडवनगरी येथे ३,१२८ मीटर, इंदिरानगर भागात ४,३४३ तर सातपूर भागात सेरेन मेडाजमधील ७,१२० मीटर याप्रमाणे पाइपलाइन टाकण्यात आली आहे.

MNGL latest Marathi News
नोकरीच्या आमिषाने तरुणीकडून बेरोजगार तरुणांची फसवणूक

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com