
इंधन, गॅसचा वाढता आकडा, सोसवेना महागाईचा भडका..!
नाशिक : गेल्या काही दिवसांपासून इंधनाच्या दरांमध्ये सातत्याने वाढ (Petrol & Diesel Price Hike ) होत आहे. दुसरीकडे घरगुती गॅस सिलिंडरच्या (Household LPG Cylinder) दरांमध्ये वाढ केल्याने सर्वसामान्यांचे आर्थिक गणित बिघडले आहे. इंधन, गॅसचा वाढत्या आकड्याने महागाईचा भडका उडला आहे. या वाढीव दरामुळे सुमारे दैनंदिन चाळीस हजार गॅसजोडणी धारकांना वाढीव दराने सिलिंडरसाठी पैसे मोजावे लागणार आहे.
आंतरराष्ट्रीय स्तरावर निर्माण झालेल्या परिस्थितीपासून राष्ट्रीय स्तरावरील विविध कारणांनी महागाईचा भडका उडालेला आहे. गेल्या काही दिवसांपासून इंधन दरवाढ होत असल्याने पेट्रोलचे दर सव्वाशे रुपये, तर डिझेलचे दर १०५ रुपयांपर्यंत पोचले आहे. आधीच महागाईने जनता होरपळत असताना गॅस सिलिंडरच्या दरांमध्ये वाढ झाल्याने सामान्यांकडून नाराजी व्यक्त केली जाते आहे. शासनाने करांमध्ये सवलत देताना सर्वसामान्यांवर येणारा आर्थिक बोझा कमी करावा, अशी मागणी आता होऊ लागलेली आहे. (general public will deteriorate at rate of increasing gas cylinders followed by fuel.)
चाळीस हजार सिलिंडरची रोज डिलिव्हरी
सध्या शहरात सुमारे सोळा लाख गॅसजोडणीधारक आहेत. अशात महिन्याला सरासरी पंधरा ते सोळा गॅस सिलिंडरची शहरात गरज भासते. अशात दैनंदिन सुमारे चाळीस हजार सिलिंडरची डिलिव्हरी होत असते. त्यामुळे वाढीव दरांचा विचार करता ग्राहकांवर रोज वीस लाख रुपयांपर्यंतचा अतिरिक्त आर्थिक भार येणार आहे.
तीस हजार लिटर पेट्रोल, पंचवीस हजार डिझेलचा खप
शहर परिसरात सुमारे नव्वद पेट्रोलपंप ग्राहक सेवेत उपलब्ध आहेत. या पंपांच्या माध्यमातून दैनंदिन पेट्रोलची तीस हजार लिटर, तर डिझेलची पंचवीस हजार लिटरची विक्री होते. य ६ एप्रिलपासून इंधनाचे दर वाढलेले नसले तरी सध्या पेट्रोलचे दर सव्वाशेच्या घरात आहे. तर, डिझेलच्या दरांनी शंभरी ओलांडलेली आहे. वाढीव किमतीचा खपावर परिणाम झालेला असला तरी इंधनावर होणाऱ्या मासिक खर्चाचा अतिरिक्त आर्थिक भार ग्राहकांवर येतो आहे.
हेही वाचा: एसटी सुसाट.!; मालेगावी दररोज 6 लाखांचे उत्पन्न
असे आहेत सध्याचे दर-
गॅस सिलिंडर---------१ हजार ००३ रुपये.
डिझेल-----------------१०३.५४ रुपये.
पेट्रोल------------------१२०.८७ रुपये.
हेही वाचा: Nandgaon : उन्हाळी सुट्टीतही 'रुम टु रिड' चा उपक्रम
"इंधन दरवाढीमुळे पेट्रोलपंप चालकांचे आर्थिक स्थैर्य धोक्यात आलेले आहे. सरकारने वेळीच उपाययोजना करत सर्वसामान्यांसह व्यवसायिकांना दिलासा मिळवून द्यावा, ही आमची आग्रही मागणी आहे." - विजय ठाकरे, उपाध्यक्ष, महाराष्ट्र पेट्रोल डीलर्स असोसिएशन.
"आंतरराष्ट्रीय परिस्थितीमुळे पुरवठ्यावर होणाऱ्या परिणामांमुळे गॅस दर वाढलेली आहे. अशात लवकरात लवकर परिस्थिती सामान्य होऊन सर्वसामान्यांच्या आवाक्यात पुन्हा दर यावेत, अशी अपेक्षा आहे." - रोहित वैशंपायन, गॅस वितरक.
Web Title: General Public Will Deteriorate At Rate Of Increasing Gas Cylinders Followed By Fuel Nashik News
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..