
Nandgaon : उन्हाळी सुट्टीतही 'रुम टु रिड' चा उपक्रम
वेहेळगाव (जि. नाशिक) : जिल्हा परिषद (ZP) शाळेतील विद्यार्थ्यांना वाचनाची गोडी लागावी, यासाठी ‘रूम टू रीड’ (Room to Read) या आंतरराष्ट्रीय संस्थेच्या पुढाकाराने फेब्रुवारीपासून नांदगावात प्रकल्प राबविण्यात येत आहे. (Room to read Program during summer vacation in Nandgaon Nashik News)
हेही वाचा: नाशिक : आर्थिक गैरव्यवहाराला राजकीय वळण देण्याचा आटापिटा
नांदगाव तालुक्यातील साकोरा, बोलठाण उर्दू, नांदूर, तळेवस्ती, कदमवस्ती (मोरझर) या शाळांनी आठवड्यातून दोन दिवस शाळेतील व बाहेरगावावरून नातेवाइकांकडे आलेल्या मुलांना शाळेत बोलावून दोन तास मुलांना पुस्तके देऊन त्यांच्याकडून वाचन करून घेतले. वाचनासाठी आवश्यक साहित्यही दिले आहे. केंद्रातील इतर शाळेतून आवर्तन पद्धतीने पुस्तके बदलली जात आहेत. यात बालसाहित्य ‘बालस्नेही’ कसे राहील, याकडे लक्ष दिले जात आहे. मुलांना पुस्तके देणे एवढेच काम नाही, तर त्यांचे आकलन वाढावे, त्यांची बौद्धिक क्षमता वाढावी, यासाठी प्रयत्न करण्यात येत आहे, असे तालुका समन्वयक श्रेया बागडे यांनी सांगितले.
हेही वाचा: Malegaon : मुबलक उसामुळे राज्यात अजुनही 121 साखर कारखाने सुरु
Web Title: Room To Read Program During Summer Vacation In Nandgaon Nashik News
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..