Ghatanandur Observes Complete Bandh Against Malegaon Atrocity
Sakal
नाशिक
Nashik Protest : मालेगावातील चिमुकलीवरील अत्याचाराच्या निषेधार्थ घाटनांदूर पूर्ण बंद; मोर्चातून आरोपीला फाशीची जोरदार मागणी!
Justice For Child : मालेगावातील चिमुकलीवरील अत्याचार आणि हत्येच्या निषेधार्थ घाटनांदूर येथे बहुजन विकास मोर्चा व एमआयएमच्या आवाहनावर बंद पाळण्यात आला. मोर्चातून आरोपीस फाशीची व जलदगती न्यायालयात खटला चालवण्याची मागणी करण्यात आली.
घाटनांदूर : नाशिक जिल्ह्यातील मालेगाव तालुक्यात चिमुकलीवर अत्याचार करून क्रूरपणे हत्या केल्याच्या निषेधार्थ (ता.२५) मंगळवारी बहुजन विकास मोर्चा व एमआयएमच्या वतीने बंदची हक्क देण्यात आली होती. या बंदला प्रतिसाद देत येथील सर्व व्यापाऱ्यांनी आपापली व्यापारी प्रतिष्ठाने बंद ठेवून प्रतिसाद देऊन निषेध व्यक्त केला.

