esakal | घोटी रुग्णालयाचे दुखणे कायम! जुन्या-नव्याचा मेळ बसेना

बोलून बातमी शोधा

Ghoti Hospital

घोटी रुग्णालयाचे दुखणे कायम! जुन्या-नव्याचा मेळ बसेना

sakal_logo
By
रोहित कणसे

घोटी ( जि. नाशिक) : आदिवासी बांधवांच्या आरोग्यसेवेसाठी बांधलेले रुग्णालय अखेरच्या घटका मोजत असल्याचे म्हणण्यास हरकत नाही. घोटी ग्रामीण रुग्णालयात अधिकारी, कर्मचाऱ्यांना कामकाज करणे कठीण होऊन बसले आहे. अनेकदा पत्रव्यवहार करूनदेखील केराची टोपली दाखविली जात असल्याचे वैद्यकीय अधीक्षक हतबल झाले आहेत. अपुरी इमारत, तुटलेल्या खिडक्या-दरवाजे, जुनाट यंत्रे, रिक्त कर्मचारी, रुग्णालय जागेत खासगी अतिक्रमण, जुने अधिकारी गेले नवीन आले, यामुळे नव्या-जुन्याचा मेळ बसेना. आजही रुग्णालयाचे दुखणे मात्र कायम आहे. (Ghoti Hospital built for the health care of the tribal people is counting the last days)


सार्वजनिक बांधकाम विभाग-पंचायत समिती अधिकारी-स्थानिक ग्रामपालिका कारभाऱ्यांच्या दुर्लक्षामुळे आपत्कालीन परिस्थितीशी रुग्णालय अधिकारी-कर्मचारी जीव धोक्यात घालून कसे झुंजणार, याकडे मात्र स्थानिक प्रशासन डोळेझाक करत आहे. लस घेण्यासाठी सकाळी सातपासून रांगा लागत आहेत. ग्रामीण खेडीपाडी यांसह शहरातील गरीब-गरजू लोकांच्या सोयीचे ठिकाण असल्याने अंतर बाह्यरुग्ण संख्याही मोठ्या प्रमाणात आहे. रुग्णालयात नित्याची गर्दी निर्माण होऊन मुख्य रस्ताही कोंडीत सापडला जात आहे. रुग्णालयात येण्यासाठी दोन गेट आहेत. त्यातील एका गेटवर खासगी अतिक्रमण केल्याने वाहतुकीचा सर्व भार एकाच गेटवर आहे. रुग्णालयात आपत्कालीन गंभीर परिस्थिती निर्माण झाल्यास बाहेर पडण्यास दुसरा मार्गच नाही. रुग्णवाहिका, अग्निशमन बंब अथवा अत्यावश्यक सेवेतील वाहने ने-आण करणे कठीण झाले आहे. आपत्कालीन परिस्थितीवर मात करण्यासाठी प्रभावीपणे शासकीय यंत्रणा-स्थानिक ग्रामपालिका कारभाऱ्यांनी पुढील आपत्ती टाळण्यासाठी विकृत व्यवस्थेशी दंड थोपटणे गरजेचे आहे.

हेही वाचा: तरुणाचा हातपाय बांधलेला विहिरीत मृतदेह; संशय बळावला


आपत्तीजनक परस्थिती निर्माण झाल्यास नागरिकांच्या सुरक्षेच्या दुष्टीने गंभीर घटना घडू शकते. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी, तहसीलदार, गटविकास अधिकाऱ्यांनी तातडीने संबंधित अतिक्रमण यांसह रुग्णालयात सोयी-सुविधा तत्पर उभ्या करण्यासाठी प्रयत्न करावा. माझे संपूर्ण पाठबळ आपल्या पाठीशी आहे.
-हिरामण खोसकर, आमदार


वरिष्ठ कार्यालय, सार्वजनिक बांधकाम विभाग, पंचायत समितीला अनेकदा पत्रव्यवहार करूनदेखील सहकार्य मिळत नाही. आपत्तीजनक परिस्थिती उद्‍भवल्यास गंभीर परिस्थिती निर्माण होऊ शकते.
-डॉ. संजय सदावर्ते, वैद्यकीय अधीक्षक, घोटी ग्रामीण रुग्णालय

हेही वाचा: सकारात्मक विचारांनी वाढले मनोबल! एकाच कुटुंबातील 9 जण कोरोनामुक्त