Nashik Crime: घोटी पोलिसांनी टोलनाक्यावर पकडला 64 लाखांचा गुटखा

Item seized by the police. Along with Assistant Police Inspector Shraddha Gandhas and team.
Item seized by the police. Along with Assistant Police Inspector Shraddha Gandhas and team.esakal

Nashik Crime : जिल्ह्यातील राष्ट्रीय व राज्य महामार्गावर गुटखा, पानमसाला, तंबाखूजन्य तसेच अंमली पदार्थ व अवैध दारूची होणारी तस्करी रोखण्याच्या मोहिमेत आज पोलिसांनी घोटी टोलनाक्यावर रचलेल्या सापळ्यात ६४ लाखांचा गुटखा जप्त केला.

पोलिस अधीक्षक शहाजी उमाप यांच्या आदेशानुसार ही कारवाई करण्यात आली. (Ghoti police caught Gutkha worth 64 lakhs at toll booth Nashik Crime)

पोलिसांना मिळालेल्या माहितीनुसार सोमवारी (ता.५) पहाटेच्या सुमारास घोटी पोलिस ठाण्याच्या हद्दीतील मुंबई आग्रा महामार्गावरून गुटख्याची वाहतूक होणार होती. त्यानुसार घोटी पोलिस ठाण्याच्या सहाय्य्क पोलिस निरीक्षक श्रद्धा गंधास यांच्या पथकाने घोटी टोलनाका परिसरात सापळा रचला.

नाशिकहून मुंबईच्या दिशेने जाणारा आयशर ट्रक (एम.पी. ०४ जीए. ८८३०) थांबविले. त्याची तपासणी केली असता त्यात कमला पसंद पानमसाला व काळ्या रंगाच्या सुगंधित तंबाखूच्या ११८ गोण्या (६४ लाख २६ हजार २००) आढळल्या.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

Item seized by the police. Along with Assistant Police Inspector Shraddha Gandhas and team.
Crime News: '...म्हणून मी जगाचा निरोप घेतोय', सुसाईड नोट लिहून भावी डॉक्टरची आत्महत्या

त्याच्यासह आयशर वाहन असा एकूण ७४ लाख २६ हजार २०० रुपयांचा मुद्देमाल मिळून आला. या कारवाईत आयशर चालक मनीष नारायणप्रसाद शर्मा (२६, रा. नेहरूनगर, इंदूर)यास ताब्यात घेण्यात आले.

त्याच्याविरुद्ध घोटी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सहाय्यक पोलिस निरीक्षक श्रद्धा गंधास तपास करत आहे. उपनिरीक्षक संजय कवडे, भीमा गांगोडे, हवालदार भास्कर शेळके, विक्रम झाल्टे, शिवाजी शिंदे, श्रीकांत दोंदे आदींनी कारवाईत भाग घेतला. पथकाने केलेल्या कामगिरीची दखल घेऊन पोलिस अधीक्षकांनी दहा हजाराचे बक्षीस जाहीर केले.

Item seized by the police. Along with Assistant Police Inspector Shraddha Gandhas and team.
Miraj Crime : शाळेत घेऊन जातो असं सांगून अल्पवयीन मुलीवर अत्याचार; मित्राला 30 वर्षांची शिक्षा

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com