Farmers Protest
sakal
नाशिक: घोटी ते त्र्यंबकेश्वर (पेगलवाडी)दरम्यान रस्त्याच्या चौपदरीकरणाला शेतकऱ्यांचा विरोध कायम असून, रविवारी (ता. २) मोजणीसाठी आलेल्या खासगी कंपनीच्या व्यक्तींना त्यांनी पिटाळून लावले आहे. आहुर्ली येथे या शेतकऱ्यांनी बैठक घेत इंचभरही जमिनीची मोजणी करू न देण्याचा निर्धार व्यक्त करीत प्रशासनाविरोधात उपोषणाची तयारी सुरू केली आहे.