esakal | "खडसेंचे मानसिक संतुलन बिघडले" गिरीश महाजन यांची टिका

बोलून बातमी शोधा

Girish Mahajan and Eknath Khadse

"खडसेंचे मानसिक संतुलन बिघडले" गिरीश महाजन यांची टिका

sakal_logo
By
विक्रांत मते

नाशिक : राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे व माजी मंत्री गिरीश महाजन यांच्यातील शाब्दिक वार अद्यापही सुरू आहे. खडसे यांची शिवराळ भाषेतील ऑडिओ क्लिप व्हायरल झाल्यानंतर त्यावर प्रतिक्रिया देताना गिरीश महाजन यांनी एकनाथ खडसे यांचे मानसिक संतुलन बिघडण्याची प्रतिक्रिया दिली.

जळगाव जिल्ह्यातील जामनेर मतदार संघातील वडगाव बुद्रुक या गावातील एका व्यक्तीने एकनाथ खडसे यांच्याशी दूरध्वनीवरून संपर्क साधला असता गावात पाणी नसल्याची खंत व्यक्त केली. त्यावर उत्तर देताना खडसे यांनी महाजन यांच्या संदर्भात शिवराळ भाषेत विधान केले. त्यात खडसे यांनी महाजन फक्त पोरींचे फोन उचलतो, त्याचबरोबर मतदारसंघातील लोकांचे प्रश्न सोडून महाजन पश्चिम बंगाल मध्ये काय फिरत बसलेत अशी टीका केली. त्यावर नाशिक दौऱ्यावर आलेल्या महाजन यांना विचारले असता त्यांनी खडसे यांचे मानसिक संतुलन बिघडल्याची टिका केली. खडसे यांचा त्यात दोष नाही त्यांचे वय वाढले आहे, अनेक आजार असल्यामुळे त्यांचे मानसिक संतुलन बिघडले आहे. भाजपमध्ये असताना मुख्यमंत्री पदाचे स्वप्न बघितलेल्या खडसे यांना राष्ट्रवादीत प्रवेश केल्यानंतर साधी आमदारकी सुद्धा मिळू शकली नाही. त्यांच्या मुलीलाही लोकांनी नाकारले. त्यामुळे त्यांची मानसिक स्थिती बिघडल्याची टीका महाजन यांनी केली.

हेही वाचा: राज्य सरकारकडून नाशिकसह उत्तर महाराष्ट्रावर अन्याय - गिरीश महाजन