esakal | राज्य सरकारकडून नाशिकसह उत्तर महाराष्ट्रावर अन्याय - गिरीश महाजन

बोलून बातमी शोधा

girish mahajan
राज्य सरकारकडून नाशिकसह उत्तर महाराष्ट्रावर अन्याय - गिरीश महाजन
sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

नाशिक : राज्यसोबतच शहरात देखील कोरोना महामारीने थैमान घातले आहे. जिल्ह्यात रुग्णांना रेमडेसिव्हिर इंजेक्शन आणि ऑक्सिजनचा तुटवडा जाणवत आहे. या दरम्यान भाजपचे आमदार गिरीश महाजन यांनी राज्य सरकारकडून नाशिकसह उत्तर महाराष्ट्रावर ऑक्सिजन आणि रेमडेसिव्हीर पुरवठाबाबत अन्याय केला जात असल्याचा आरोप केला आहे. महाजन यांनी आज (दि.२८) नाशिक जिल्ह्यातील कोरोना परिस्थितीचा आढावा घेतला.

वजनदार मंत्र्यांच्या जिल्ह्यात मात्र मुबलक रेमडेसिव्हिर

महाजन यांनी जिल्हा रुग्णलयाला देखील भेट दिली. जिल्ह्यात कोरोना रुग्ण दगावत आहेत औषधे आणि ऑक्सिजनसाठी नातेवाईकांना धावपळ करावी लागत आहे. जिल्ह्यात कोरोना रुग्णांसाठी रेमडेसिवीर इंजेक्शन उपलब्ध नाही आहे. राज्य सरकारने ऑक्सिजन पुरवठाही ५० टक्के केला असल्याचे यावेळी गिरीश महाजन यांनी म्हटले आहे. नाशिकसाठी राज्य सरकारद्वारे उदासिनतेचे धोरण आहे. परंतु वजनदार मंत्र्यांच्या जिल्ह्यात मात्र मुबलक रेमडेसिव्हिरचा पुरवठा केला जात आहे असा आरोप आमदार महाजन म्हणाले. येथे झालेल्या पत्रकार परिषदे ते बोलत होते.

हेही वाचा: डॉक्टर म्हणताहेत..!"नाशिक-नगरची झंझट नको, आम्हाला ऑक्सिजन द्या"

राज्य सरकार रेमडेसिवीर आणि ऑक्सिजन पुरवठ्यवरुन दुजाभाव करत असल्याचा आरोप महाजन यांनी यावेळी केला. नाशिक शहरात सर्वात जास्त कोरोनाबाधितांची संख्या आहे. मृत्यू होणाऱ्या रुग्णांची संख्याही जास्त असल्यामुळे नाशिकमध्ये मोठ्या प्रमाणात रेमडेसिव्हिर इंजेक्शनची आवश्यकता आहे. या दरम्यान खासगी रुग्णालयांमध्ये रुग्णांची लुट केली जात असल्याचे महाजन यांनी मान्य केले. तसेच राज्य सरकारचे नियोजन नसल्याने आरोग्य व्यवस्था कोलमडली असून, तीन पक्षांचे सरकार असल्याने तिघांचे वेगवेगळे निर्णय घेतले जात असल्याने परिस्थिती बिकट झाल्याचा आरोपही त्यांनी यावेळी केला.

नाशिकच्या कोरोना स्थिती संदर्भात भाजप शिष्टमंडळाच्यावतीने मुख्यमंत्र्यांची तसेच राज्यपालांची भेट घेऊन व्यथा मांडणार असल्याचे त्यांनी सांगीतले एवढेच नाही तर वेळ पडल्यास न्यायालयाचा दरवाजा ठोठवू असे देखील त्यांनी यावेळी स्पष्ट केले.

हेही वाचा: महामारी आजारांचा चारशे वर्षांचा इतिहास! सोशल मीडियावर संदर्भासह चित्र व वृत्त