esakal | आई..मला शाळेतच नाही जायचं.. परीक्षेत शेजारी बसलेल्या मुलाने माझ्यासोबत...
sakal

बोलून बातमी शोधा

girl molest.jpg

विशेष म्हणजे या प्रकाराबद्दल पीडित मुलीच्या पालकांनी मुख्याध्यापिका, तसेच पालक शिक्षक संघाकडे लेखी तक्रार नोंदवून संबंधित विद्यार्थ्यावर कारवाई करण्याची मागणी केली होती. मात्र, संबंधित विद्यार्थ्यावर कारवाई न झाल्याने पालकांनी पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली.

आई..मला शाळेतच नाही जायचं.. परीक्षेत शेजारी बसलेल्या मुलाने माझ्यासोबत...

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

नाशिकरोड : शाळेत चाचणी परीक्षा सुरू असताना शेजारी बसलेल्या मुलाने अल्पवयीन मुलीशी अश्लील गैरवर्तन केल्याचा प्रकार जेलरोडवरील एका शाळेत घडला. हा प्रकार ऑगस्ट महिन्यात घडला असून, पीडित मुलीने शाळेत जाण्यास नकार दिल्याने या घटनेला वाचा फुटली.

अशी घडली घटना...

शाळेत चाचणी परीक्षा सुरू असताना शेजारी बसलेल्या मुलाने अल्पवयीन मुलीशी अश्लील गैरवर्तन केल्याचा प्रकार जेलरोडवरील एका शाळेत घडला. विशेष म्हणजे या प्रकाराबद्दल पीडित मुलीच्या पालकांनी मुख्याध्यापिका, तसेच पालक शिक्षक संघाकडे लेखी तक्रार नोंदवून संबंधित विद्यार्थ्यावर कारवाई करण्याची मागणी केली होती. मात्र, संबंधित विद्यार्थ्यावर कारवाई न झाल्याने पालकांनी पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली. या घटनेतील पीडित मुलगी पहिलीच्या वर्गात शिक्षण घेते, तर तिच्यासोबत अश्लील गैरवर्तन केल्याचा आरोप असलेला मुलगा त्याच शाळेत आठवीच्या वर्गात शिक्षण घेतो. पीडित मुलीच्या आईने दिलेल्या फिर्यादीवरून नाशिकरोड पोलिसांनी पोक्सो कायद्यांतर्गत संशयित अल्पवयीन मुलाविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

हेही वाचा > थरारक! साक्षात समोर मृत्यू उभा असताना "माऊलीला" कुठे जीवाची पर्वा होती? तिचा जीव बाळामध्येच...

हेही वाचा > जेव्हा लॉजवर गणवेशधारी शाळकरी मुलामुलींची धांदल उडते....पोलिसही चक्रावले!