
परिचितास दुचाकीवर लिफ्ट देणे एकास चांगलेच महागात पडल्याची घटना घडली आहे. मित्राचा फोन आल्याने त्याने पाठीमागे बसलेल्या परिचितास खिशातील मोबाईल काढण्यास सांगितला असता त्याने मोबाईल तर काढला मात्र...
'मला घरी सोडतोस का?' म्हणत लिफ्ट तर घेतली; अन् काही अंतरावर जाताच
नाशिक : परिचितास दुचाकीवर लिफ्ट देणे एकास चांगलेच महागात पडल्याची घटना घडली आहे. मित्राचा फोन आल्याने त्याने पाठीमागे बसलेल्या परिचितास खिशातील मोबाईल काढण्यास सांगितला असता त्याने मोबाईल तर काढला मात्र...
अशी आहे घटना
हुसेन फिरोज शेख (रा. सिन्नर फाटा) असे खंडणी मागणाऱ्या संशयिताचे नाव आहे. याप्रकरणी तोहीद वाहिद खान (१९ रा.सिन्नरफाटा) या युवकाने तक्रार दाखल केली आहे. तोहिद खान शुक्रवारी (ता.२८) रात्री त्याच्या दुचाकीवर प्रवास करीत असतांना वाटेत त्यास संशयित भेटला. संशयिताने घरी जाण्यासाठी लिफ्ट मागितल्याने तोहिदने त्यास दुचाकीवर बसविले. काही अंतर जात नाही तोच मित्राचा फोन आल्याने चालक तोहिद याने संशयितास पाठीमागील खिशात ठेवलेला मोबाईल काढण्यास सांगितले. त्यानंतर सिन्नर फाटा येथील महापालिका शाळेजवळ संशयित दुचाकीवरून उतरला असता त्याने मोबाईल देण्यास नकार दिला.
हेही वाचा > एकीकडे गौराईनिमित्त स्त्रीशक्तीचा जागर; दुसरीकडे 'ती'च नकोशी? चिमुरड्या जीवाला शिक्षा कशासाठी?
परिचितास दुचाकीवर लिफ्ट देणे त्यांना चांगलेच महागात पडले. फोन पाहिजे असेल तर दहा हजार रूपये दे नाहीतर फोन विसरून जा अशी धमकी दिल्याने दुचाकीस्वाराने पोलीस ठाण्यात गाठून तक्रार दिली. याप्रकरणी नाशिक रोड पोलीस ठाण्यात खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
हेही वाचा > गंभीर! १५ वर्षीय मुलीची बापा विरोधात तक्रार; वेळीच वाचा फोडली म्हणून प्रकार उजेडात
संपादन - किशोरी वाघ
Web Title: Giving Lift Acquaintance Two Wheeler Has Become Very Risky
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..