Bad Effects of Virtual World : गुन्हेगारीच्या उदात्तीकरणामुळे विद्यार्थी भरकटले; आभासी जगाचा होतोय वाईट परिणाम

Bad Effects of Virtual World
Bad Effects of Virtual Worldesakal

Bad Effects of Virtual World : दाक्षिणात्य चित्रपटात कोयत्याने वार करणारा अभिनेता, त्याप्रमाणे सोशल मीडियावर सिनेस्टाईल रिल्स तयार बनविणे हे एक फॅड झाले आहे. शाळा व महाविद्यालयातील चार ते पाच जण विद्यार्थी एकत्र येतात, अन् ग्रुप बनवून शाळेच्या आवारात फिरतात.

याच विद्यार्थ्यांमध्ये काही किरकोळ वाद विवादातून शाब्दिक चकमक होते. शालेय व महाविद्यालयीन परीक्षेच्या शेवट असलेल्या पेपरच्या दिवशी त्याचे पर्यावसन हाणामारीत होते. एकंदरीत शालेय विद्यार्थ्यांमध्ये अंधानुकरण वाढत चालले आहे.

सध्या चाकू, कोयते घेऊन हल्ले होत आहेत. उद्या गोळीबार झाले तर नवल वाटायला नको, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. (glorification of crime led students astray Bad effects of virtual world nashik news)

दोन वर्षाच्या कोरोनाकाळात मोबाईलचा अधिक वापर वाढला. कारण होते ते, ऑनलाइन शिक्षण प्रणाली. यामुळे विद्यार्थी दशेत असलेला युवा या मोबाईल युगात गुरफटून गेला आहे. आजचा युवा हा फेसबुक, इंस्टाग्राम, यू- ट्यूबवर तथाकथित भाईचे व्हिडिओ फॉलोअर्स बनत चालला आहे.

यामध्ये सर्वाधिक शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थी आढळून येत आहेत. पंचवटी पोलिस ठाणे हद्दीतील एका शाळेच्या बाहेर मध्यंतरी दोन अल्पवयीन मुलांची फ्रीस्टाईल हाणामारी झाली होती, त्याचे कारण अगदी शुल्लक होते.

या हाणामारीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. संबंधित विद्यार्थी व त्यांचे पालकांना पोलिसांनी बोलावून तंबी देत मुलांकडे लक्ष देण्याचे सांगितले होते. काही दिवसांपूर्वी दिंडोरी रोडवरील एका शाळेच्या आवाराबाहेर अशाच प्रकारे हाणामारी झाली, मात्र संपूर्ण शहरात चर्चा रंगली ती कोयता हल्ल्याची.

हेही वाचा : सामान्यांचा पैसा सुरक्षित ठेवण्यासाठीच Virtual Currency करकक्षेत

Bad Effects of Virtual World
Unseasonal Rain Damage : आम्हाला मदत द्या हो! आडगावच्या शेतकऱ्याची आर्त हाक

परीक्षा काळात द्यावे लक्ष

नाशिक शहर परिसरात, दिंडोरी रोड तसेच गंगापूर रोडवरील नामांकित शाळेबाहेर विद्यार्थ्यांची हाणामारी झाली. यात धारदार शस्त्राचा वापर झाल्याची चर्चा झाली होती. संबंधित पोलिसांनी कारवाईदेखील केली होती.

मात्र, यावर परीक्षा काळात पेपर सुटण्याच्या वेळी साध्या गणवेशात पोलिस कर्मचारी नियुक्त करावे, ज्यामुळे घटना घडण्यापूर्वीच त्यावर निर्बंध घालता येईल आणि एक धाक निर्माण होईल.

पालकांचा हवा संवाद

आजच्या धावपळीच्या युगात नोकरी व काम धंद्यात पालक व्यस्त असतात. यामुळे मुलांकडे दुर्लक्ष होते. शाळेत व महाविद्यालयात मुलगा व मुलगी शिकत असताना काही अडचणी, शालेय प्रवास योग्य सुरू आहे किंवा नाही.

मित्र परिवार कोण आहे. त्यास संगत योग्य आहे किंवा नाही.याची चौकशी करावी. वेळोवेळी शाळेत जाऊन शिक्षकांना भेटून हाल हवाल जाणून घ्यावे. आपला पाल्य कोणाचा फेसबुक फ्रेंड आहे, कोणाला फॉलो करतो आहे, काही व्यसन करतो का, तसेच अशाप्रकारचे यु- ट्युब चॅनेल सबस्क्राईब केले आहे का, याची पडताळणी गरजेची आहे.

पंचवटी विभागात एकूण २९ शाळा असून, आजरोजी उच्च प्राथमिक, माध्यमिक विद्यालयात शेवटचा पेपर आहे. तरी पोलिस प्रशासनाने याची दखल घेत शाळेबाहेर बंदोबस्त लावावा. पालकांनीदेखील आपला मुलगा दप्तरात काही हत्यार घेऊन चालला आहे का, याची खातरजमा करावी.

Bad Effects of Virtual World
Unemployed Youth Survey : बेरोजगार युवकांचे होणार सर्वेक्षण; राष्ट्रीय सेवा योजनेच्‍या माध्यमातून प्रक्रिया

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com