गोदावरी एक्स्प्रेस हिंगोलीपर्यंत नेण्यास नाशिककरांचा विरोध | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Manmad-Mumbai Godavari Express)
गोदावरी एक्स्प्रेस हिंगोलीपर्यंत नेण्यास नाशिककरांचा विरोध

गोदावरी एक्स्प्रेस हिंगोलीपर्यंत नेण्यास नाशिककरांचा विरोध

नाशिक रोड : हिंगोलीच्या नागरिकांना मुंबईला जाण्यासाठी सोयीचे व्हावे, यासाठी मनमाड- मुंबई गोदावरी एक्स्प्रेस (Manmad-Mumbai Godavari Express) हिंगोलीपर्यंत नेण्याची मागणी हिंगोलीचे खासदार हेमंत पाटील यांनी केली आहे. रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे (Raosaheb Danve) यांना तसे पत्र लिहिले आहे. नाशिककरांनी मात्र या मागणीला विरोध केला आहे. सध्या गोदावरी एक्स्प्रेस (गाडी नं. १२११७ आणि १२११८) कोरोना संकटामुळे दोन वर्षापासून बंद आहे. ती सुरू करण्याची जोरदार मागणी असूनही रेल्वे दुर्लक्ष करत आहेत.

हेही वाचा: ‘...मृत्यूचे शिकार बनू नका’ असं म्हणणाऱ्याला मुंबई महापालिकेचे उत्तर

मनमाडहून सुटणारी गोदावरी एक्स्प्रेस मुंबईला जाण्यासाठी नाशिक जिल्हा व शहरातील नागरिकांसाठी अत्यंत सोयीची आहे. या गाडीची वेळ तीच ठेऊन ती हिंगोलीपर्यंत न्यावी, अशी त्या जिल्ह्यातील नागरिकांची मागणी आहे. गाडीच्या मार्गात हिंगोली, पूर्णा, परभणी, जालना, मुकुंदवाडी, औरंगाबाद, लासूर, रोटेगाव, मनमाड, लासलगाव, निफाड, नाशिक, देवळाली, इगतपुरी, कल्याण, ठाणे, दादर, मुंबई ही प्रमुख स्थानके घ्यावीत, अशी मागणी खासदार हेमंत पाटील यांनी रेल्वे राज्यमंत्री दानवे यांच्याकडे पत्राव्दारे केली आहे. ही गाडी हिंगोलीपर्यंत नेण्यास नाशिककरांनी विरोध केला आहे.

हेही वाचा: ‘कोरोना, शाळा माझी बंद करू नको!’ विद्यार्थ्याने मांडली गाण्यातून व्यथा

गाडी जिल्ह्याबाहेर नेऊ नये, अशी मागणी मासिक पासधारक व प्रवासी वेल्फेअर असोसिएशनचे अध्यक्ष राजेश फोकणे, माजी आमदार योगेश घोलप, किरण बोरसे, संजय शिंदे, कैलास बर्वे, उज्ज्वला कोल्हे, दत्ताराम गोसावी, नितीन जगताप, रेल परिषदेचे गुरुमितसिंग रावल, रेल्वे प्रवासी संघटनेचे बाळासाहेब केदारे आदींनी केली आहे. गोदावरी एक्स्प्रेस ही पंचवटीप्रमाणेच नाशिककरांची सोयीची व आवडीची गाडी आहे.

हेही वाचा: 24 तासांत 2 लाख 67 हजार रुग्णांची नोंद, मृत्यूही वाढले

मुंबईला जाताना सकाळी साडेनऊला तीन नाशिक रोडला येते. ती हिंगोलीपर्यंत नेल्यास मराठवाड्याच्या नागरिकांची सोय होणार असली तरी नाशिककरांची गैरसोय होणार आहे. हिंगोलीपर्यंत गाडी नेल्यास ती तिकडूनच पूर्ण भरून येईल. मनमाड, निफाड, नाशिक रोड, देवळाली, इगतपुरी या स्थानकातील नाशिककरांना जागा मिळणार नाही, असा आक्षेप आहे. नाशिक- पुणे एक्स्प्रेस नाशिकपर्यंत होती, ती भुसावळपर्यंत नेण्यात आल्याने नाशिककरांना जागा मिळत नाही. तपोवन एक्स्प्रेस मनमाडपर्यंत होती, ती पळवून नांदेडपर्यंत नेण्यात आली. राज्यराणी एक्स्प्रेसही मनमाड- मुंबई अशी होती, ती जालन्यापर्यंत नेण्यात आली.

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
loading image
go to top