‘कोरोना, शाळा माझी बंद करू नको!’ विद्यार्थ्याने मांडली गाण्यातून व्यथा

एका मिनिटाच्या या गाण्याची सध्या महाराष्ट्रभर चर्चा असून, सोशल मीडियावर धूम करीत आहे.
nagpur
nagpursakal
Summary

एका मिनिटाच्या या गाण्याची सध्या महाराष्ट्रभर चर्चा असून, सोशल मीडियावर धूम करीत आहे.

नागपूर : कोरोनाची तिसरी लाट (third wave of corona)येऊन धडकताच पुन्हा शाळांना कुलूप लागले. परिणामतः वर्गांमध्ये गोंगाट करणारे विद्यार्थी अचानक आपापल्या घरांमध्ये बंदिस्त झाले. नुकसान होत असल्यामुळे मुलांमध्ये अस्वस्थता व चिडचिड वाढली आहे. या पार्श्वभूमीवर अकोल्याच्या एका शाळकरी विद्यार्थ्याने (akola school students) अनोख्या पद्धतीने कोरोना गीताच्या(corona song) माध्यमातून चिमुकल्यांची व्यथा मांडली आहे. एका मिनिटाच्या या गाण्याची सध्या महाराष्ट्रभर चर्चा असून, सोशल मीडियावर धूम करीत आहे.

nagpur
पुण्याने नवीन कोरोना रुग्णांचा शुक्रवारी १०००० चा आकडा केला पार

कोरोनामुळे विद्यार्थ्यांचे आधीच दोन वर्षे वाया गेले. तिसऱ्या लाटेने शाळांवर पुन्हा संक्रात आणल्याने मुले आपल्या आवडत्या शिक्षकांपासून दूर गेले. चार भिंतीच्या आड घुसमट होऊ लागल्याने मुले आपल्या अडचणी शिक्षकांना सांगू लागले. त्यांची मानसिक अवस्था बघून खडका (जि. अकोला) येथील जिल्हा परिषद शाळेचे शिक्षक व गीतकार संघदास वानखडे यांनी ‘‘कोरोना, शाळा माझी बंद करू नको!’’ हे गाणे लिहिले.

याच शाळेतील अकरा वर्षांचा विद्यार्थी आर्यन वाघकडून त्यांनी प्रॅक्टिस करवून घेतली आणि मोबाईलद्वारे व्हिडिओ बनवून गाणे शिक्षकांच्या व्हॉट्सअप ग्रूपवर टाकले. आर्यनने ठसक्या आवाजात गायिलेले हे एक मिनिटाचे गाणे लोकांना खूप आवडले. अनेकांनी ते व्हॉट्सअप, फेसबुक व इन्स्टाग्रामवर शेअर केले. पाहतापाहता अवघ्या काही तासांत हा व्हिडिओ अख्या महाराष्ट्रभर पोहोचला. या गाण्याला सोशल मीडियावर आतापर्यंत दोन लाखांवर व्ह्यूज व लाईक्स मिळाले आहेत. साम टीव्हीसह अनेक मराठी वाहिन्यांनी या लोकप्रिय गाण्याची दाखल घेतल्याची माहिती, गीतकार संघदास वानखडे यांनी दिली.

nagpur
'व्हॅाटसअप'ने चार तासात लागला मुलाचा शोध

वानखडे यांनी काही महिन्यांपूर्वी सुप्रसिद्ध गायक उमेश गवळीने गायिलेल्या ‘ओ शेठ’च्या धर्तीवर ‘ओ सर, नाही पडणार तुमचा विसर’ हे आणखी एक गाणे लिहिले होते. आर्यननेच गायिलेल्या त्या गाण्याचीदेखील सर्वत्र चर्चा झाली होती. या दोन्ही गाण्यानंतर गुरू-शिष्याची जोडी चांगलीच 'फेमस' झाली आहे. केवळ अकोल्यातच नव्हे, महाराष्ट्रातील गावखेड्यातील मुलांच्या ओठावर सध्या हे गाणे आहे. लागोपाठ दोन गाण्यांनंतर सहाव्या इयत्तेत शिकणारा आर्यन सध्या सेलिब्रिटी बनलेला आहे. भविष्यातही कोरोना व लहान मुलांचे हलकेफुलके विषय घेत गाणे लिहून ते सोशल मीडियावर व्हायरल करणार असल्याचे वानखडे यांनी सकाळशी बोलताना सांगितले. वानखडे यांनी अलीकडेच शाळेतील मुलांवर ‘सालस’ नावाचा मराठी चित्रपट बनवला होता, हे उल्लेखनीय. गाण्यासाठी शाळेच्या मुख्याध्यापिका स्वाती देशपांडे, दत्तात्रय कराळे व श्रीकृष्ण डाबेराव यांनीही योगदान दिले.

‘कोरोना, (corona)शाळा माझी बंद करू नको!’ या गाण्याच्या माध्यमातून मी शालेय विद्यार्थ्यांच्या (school closed)व्यथा मांडण्याचा प्रयत्न केला. सुदैवाने ‘ओ सर’ प्रमाणेच हे गाणेही सोशल मीडियावर (social media)हिट ठरले. या गाण्याला लोक इतके डोक्यावर घेतील, अशी कल्पनाही मी केली नव्हती. भविष्यातही असेच प्रयोग करण्याचा माझा प्रयत्न राहणार आहे

- संघदास वानखडे, गीतकार

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com