esakal | नाशिक : रामकुंड गेले पाण्याखाली; मिळेल त्याठिकाणी दशक्रिया विधी
sakal

बोलून बातमी शोधा

nashik ramkund

रामकुंड पाण्याखाली गेल्याने मिळेल त्याठिकाणी दशक्रिया विधी

sakal_logo
By
दत्ता जाधव

पंचवटी (नाशिक) : गेल्या चार दिवसांपासून सुरू असलेल्या संततधारेनंतर सोमवार (ता.१३) पासून गोदावरीच्या (godavari river) पाणीपातळीत मोठी वाढ झाली आहे. त्यामुळे एरवी मोठी गजबज असलेल्या रामकुंडावर धार्मिक विधी करण्यासाठी आलेल्यांना मिळेल त्याठिकाणी दशक्रियासह अन्य विधी पार पाडावे लागले.

मिळेल त्याठिकाणी दशक्रिया विधी

यंदा सुरवातीच्या काळात समाधानकारक पाऊस न झाल्याने गोदावरीच्या पात्र पुरेसे प्रवाही नव्हते. परंतु, गत चार दिवसांपासून गंगापूर धरण क्षेत्रात जोरदार पाऊस सुरू असल्याने गंगापूर धरणातून यंदा कालपासून दुसऱ्यांदा पाण्याचा मोठा विसर्ग करण्यात आला. त्यामुळे रामकुंड, गांधी तलावासह नदीकाठावरील सर्वच लहानमोठी मंदिरे पाण्याखाली गेली आहेत. त्यामुळे दशक्रिया विधीसह अन्य धार्मिक विधीसाठी गंगाघाटावर आलेल्या नागरिकांना मिळेल, त्याठिकाणी उंच ठिकाणी हे विधी पार पाडावे लागले. उंचवटा असल्याने अहिल्याराम व्यायामशाळेच्या खालील बाजूस असलेल्या ओट्यावर दशक्रिया विधीसाठी गर्दी उसळली होती.

हेही वाचा: नाशिक पोलिसांसमोर नारायण राणे होणार हजर!

पार्किंगच्या जागेवर पाणी

रामकुंडाचे धार्मिक महत्त्व मोठे असल्याने याठिकाणी श्राद्धादी विधीसाठी बारमाही गर्दी असते. विधीसाठी आलेले नागरिक यशवंतराव महाराज पटांगणासह पूर्वीची भाजी मंडई, गौरी पटांगण, म्हसोबा पटांगण याठिकाणी वाहने उभी करतात. मात्र, सध्या सर्वच ठिकाणी पाणी असल्याने अनेकांनी नदीकाठापासून दूर सुरक्षित जागी वाहने उभी करण्यास पसंती दिली.

हेही वाचा: लखमापूर : विवाहितेची आत्महत्या; हुंड्याच्या रक्कमेसाठी छळ

loading image
go to top